योगी सरकारची दहशत, 15 दिवसांत 50 गुन्हेगार सरेंडर; घेतली अशी शपथ 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2022 01:17 PM2022-03-27T13:17:15+5:302022-03-27T13:17:43+5:30

यातील अनेक गुन्हेगारांनी गळ्यात कार्ड लटकलेले होते. यावर, आपण आत्मसमर्पण करत आहोत, कृपया शूट करू नका, असे लिहिले होते.

Uttar Pradesh Yogi Adityanath Government fear 50 criminals surrendered in 15 days only  | योगी सरकारची दहशत, 15 दिवसांत 50 गुन्हेगार सरेंडर; घेतली अशी शपथ 

योगी सरकारची दहशत, 15 दिवसांत 50 गुन्हेगार सरेंडर; घेतली अशी शपथ 

Next


योगी आदित्यनाथ सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर राज्यातील वातावरण कमालीचे बदलले आहे. 10 मार्च रोजी आलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजपला बंपर विजय मिळाल्यानंतर आतापर्यंत 50 गुन्हेगारांनी आत्मसमर्पण केले आहे. एन्काउंटर होण्याच्या अथवा घरावर बुलडोझर चालण्याच्या भीतीने या गुन्हेगारांनी आत्मसमर्पण केले आहे.

महत्वाचे म्हणजे, यातील अनेक गुन्हेगारांनी गळ्यात कार्ड लटकलेले होते. यावर, आपण आत्मसमर्पण करत आहोत, कृपया शूट करू नका, असे लिहिले होते. अनेकांनी तर स्वतःच पोलीस ठाण्यात येऊन आत्मसमर्पण केले. पुन्हा एकदा राज्यात योगी सरकार आल्याने, भयभीत झाल्यामुळे हे गुन्हेगार असे करत असल्याचे बोलले जात आहे.

एडीजी कायदा आणि सुव्यवस्था प्रशांत कुमार म्हणाले, या 50 गुन्हेगारांनी केवळ आत्मसमर्पणच केले नाही, तर गुन्हेगारी सोडण्यासंदर्भातही भाष्य केले आहे. या 15 दिवसांत चकमकीत दोन गुन्हेगारांना गोळ्या लागल्या आहेत. याशिवाय 10 जणांना अटक करण्यात आली आहे. कुमार म्हणाले, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्यासाठी सूक्ष्म नियोजन केले जात आहे. गुन्हेगारांविरुद्ध झिरो टॉलरन्सचे धोरण पुढे नेण्याच्या दृष्टीने राज्याच्या प्रत्येक भागांसाठी स्वतंत्र नियोजन केले जात आहे. याच बरोबर, एकीकडे माफियांवर कडक कारवाई केली जात आहे, तर दुसरीकडे दक्षताही वाढवण्यात आली आहे. 112 गस्तही मजबूत करण्यात आली आहे, असेही ते म्हणाले.

प्रशांत कुमार म्हणाले, राज्यात 2017 पासून आतापर्यंत याच धोरणामुळे एकही दंगल झालेली नाही. योगी सरकार परतल्यानंतर सर्वप्रथम गौतम सिंहने सरेंडर केले. याच्यावर अपहरण आणि खंडणीचा गुन्हा होता. गेल्या 15 मार्चला गोंडा जिल्ह्यातील छपिया पोलीस ठाण्यात त्याने आत्मसमर्पण केले. याशिवाय सहारनपूर जिल्ह्यातील चिलकाना पोलीस ठाण्यात २३ गुन्हेगारांनी आत्मसमर्पण केले आहे. एवढेच नाही तर आता आपण गुन्हेगारी सोडत आहोत, असेही त्यांनी म्हटले आहे. याचवेळी, सहारनपूरच्या देवबंदमध्ये दारूच्या तस्करीशी संबंधित 4 गुन्हेगारांनी आत्मसमर्पण केले आहे. यांनी तर शपथपत्र सादर करत, आता कोणताही गुन्हा करणार नाही, असे म्हटले आहे.

Web Title: Uttar Pradesh Yogi Adityanath Government fear 50 criminals surrendered in 15 days only 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.