बाबू काळजी घे, औषध वेळेवर घे! फेसबुक लाईव्ह करून प्रियकराची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 01:56 PM2021-08-31T13:56:43+5:302021-08-31T13:58:32+5:30
उत्तर प्रदेशात बिहारमध्ये आलेल्या तरुणाची गुरुद्वाऱ्याच्या अतिथीगृहात आत्महत्या
पाटणा: वर्षानुवर्षे प्रेमसंबंध नसताना अचानक एका व्यक्तीनं माघार घेतल्यास, प्रेमसंबंध तोडल्यास दुसऱ्या व्यक्तीला प्रचंड त्रास होतो. अनेकदा अशा व्यक्ती टोकाचं पाऊल उचलतात. बिहारची राजधानी पाटण्यात असाच एक प्रकार घडला आहे. गुरुद्वाऱ्याच्या अतिथीगृहात घडलेल्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. प्रेमभंग झालेल्या तरुणानं फेसबुक लाईव्ह करून त्याचं आयुष्य संपवलं. स्वत:ची काळजी घे, वेळेवर औषध घे, असं म्हणत प्रियकरानं त्याची जीवनयात्रा संपवली.
बाललीला गुरुद्वाऱ्यातील एनआरआय अतिथीगृहाच्या खोली क्रमांक १०७ मध्ये तरुणानं आत्महत्या केल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आत्महत्या करणारा तरुण मूळचा उत्तर प्रदेशच्या शामली जिल्ह्याचा रहिवासी होता. त्याचं नाव परमजीत सिंग असं आहे. प्रेम प्रकरणातून परमजीतनं आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. सध्या अधिक तपास सुरू आहे.
पत्नी मारते, आपटते, चावते; न्याय द्या, अन्यथा इथेच मरेन! तक्रार करायला गेलेला पती रडकुंडीला
परमजीतचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नालंदा वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आला. परमजीत अनेक दिवसांपासून अतिथीगृहात वास्तव्यास होता. तो दिल्लीतल्या गुरुद्वाऱ्यात ग्रंथी होता. तिथे तो प्रवचन द्यायचा. तो दिवसभर सिमरनची भेट घेण्याचा प्रयत्न करत होता. मात्र तिनं भेटण्यास नकार दिला. त्यानंतर परमजीतनं आत्महत्या केली.
जीन्सवर पिवळा पेंट लावून विमानतळावर उतरला; अधिकाऱ्यांना संशय आला अन् मग...
फेसबुक लाईव्हमध्ये परमजीतनं त्याची प्रेयसी सिमरनसोबत बोलण्यासाठी, भेटण्यासाठी केलेले प्रयत्न सांगितले. 'सिमरना शेकडो कॉल केले. पण तिनं उत्तर दिलं नाही. तिला भेटण्यासाठी खूपदा प्रयत्न केले. ती पाटणा साहेब गुरुद्वाऱ्यात आली असल्याचं समजलं म्हणून इथे आलो. ती आज गुरुद्वाऱ्यात आली. पण तिनं मला साधं वळूनही पाहिलं नाही. तुझ्याशी कोणतेही संबंध ठेवायचे नाहीत असं म्हणून ती निघून गेली,' अशा शब्दांत परमजीतनं त्याच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला.
'तू खूष राहा. स्वत:चा संसार थाट. तू चांगलं शिक्षण घेते आहेस. त्यामुळे तुझ्याकडे सगळं असेल. शेवटी इतकंच सांगेन, मित्रांनो प्रेमाच्या भानगडीत पडू नका. तुमच्या आयुष्यावर लक्ष द्या. मी तिच्यावर खूप प्रेम करतो. आजही करतो आणि मरणानंतरही करेन. माझ्या सिमरनला कोणी काहीही बोलणार नाही. बाबू स्वत:ची काळजी घे. औषधं वेळेवर घे,' असं म्हणत परमजीतनं जीवन संपवलं.