उत्तरप्रदेशात गाढव बनला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार

By Admin | Published: January 31, 2017 04:37 PM2017-01-31T16:37:46+5:302017-01-31T16:37:46+5:30

उत्तरप्रदेशातील बहुजन समाजवादी पक्ष सर्वांना माहित आहे. थेट राज्यातील सत्ता मिळवण्याच्या स्पर्धेत हा पक्ष आहे.

Uttar Pradesh's donkey becomes the Chief Minister's candidate | उत्तरप्रदेशात गाढव बनला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार

उत्तरप्रदेशात गाढव बनला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत 

लखनऊ, दि. 31 - उत्तरप्रदेशातील बहुजन समाजवादी पक्ष सर्वांना माहित आहे. थेट राज्यातील सत्ता मिळवण्याच्या स्पर्धेत हा पक्ष आहे. पण बहुजन विजय पार्टी हा पक्ष फार कमी जणांना माहित असेल. या बहुजन विजय पार्टीने थेट गाढवालाच मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार बनवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. 
 
गाढवाला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार बनवून हा पक्ष प्रसिद्धी मिळवत आहे. गर्दभ सिंह यादव असे त्यांनी गाढवाला नाव दिले आहे. लखनऊ कँट विधानसभा मतदारसंघातून हे गाढव निवडणुकीला उभे राहणार आहे. गर्दभ या शब्दाचा संस्कृतमध्ये अर्थ गाढव होतो. 
 
आपल्या निवडणूक व्यवस्थेमध्ये अकार्यक्षम आणि कलंकित उमेदवारांना निवडणूक लढवण्याची मुभा मिळते त्याचा निषेध नोंदवण्यासाठी बहुजन विजय पार्टीने थेट गाढवालाच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार बनवले आहे.
 

Web Title: Uttar Pradesh's donkey becomes the Chief Minister's candidate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.