उत्तर प्रदेशात प्रचारावर ५,५०० कोटींची खैरात!

By admin | Published: March 18, 2017 01:48 AM2017-03-18T01:48:13+5:302017-03-18T01:48:13+5:30

नुकत्याच उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रचार मोहिमेवर वेगवेगळ््या पक्षांनी एकूण तब्बल ५,५०० कोटी रुपये खर्च केले आहेत.

Uttar Pradesh's expenditure on promotion of Rs 5,500 crore! | उत्तर प्रदेशात प्रचारावर ५,५०० कोटींची खैरात!

उत्तर प्रदेशात प्रचारावर ५,५०० कोटींची खैरात!

Next

नवी दिल्ली : नुकत्याच उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रचार मोहिमेवर वेगवेगळ््या पक्षांनी एकूण तब्बल ५,५०० कोटी रुपये खर्च केले आहेत. या रकमेतील एक हजार कोटी रुपये नोट फॉर व्होट (मतांची खरेदी) साठी खर्च करण्यात आले. होते. जवळपास एक तृतीयांश मतदारांनीही आम्ही मतांसाठी पैसे व दारू घेतल्याचे मान्य केले आहे.
एकट्या उत्तर प्रदेशमध्ये प्रमुख राजकीय पक्षांनी या निवडणुकीत ५,५०० कोटी रुपये खर्च केले आहेत. सीएमएस कंपनीने निवडणूक व्हायच्या आणि निवडणुकीनंतर केलेल्या अभ्यासाद्वारे शुक्रवारी वरील खर्चाचा दावा केला.
निवडणूक आयोगाने प्रचारासाठी प्रत्येक उमेदवाराला २५ लाख रुपये खर्चाची मर्यादा दिली होती. परंतु प्रत्येक उमेदवाराने या मर्यादेपेक्षा किती तरी जास्त आणि निवडणुकीनंतर जे घोषित केले त्यापेक्षा जास्त पैसा खर्च केला हे उघड गुपित आहे. प्रचारासाठी पारंपरिक आणि अपारंपरिक मार्गांचा वापर केला गेला. मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यम, व्हिडिओ व्हॅन्स, स्क्रीन प्रोजेक्शन्स आदींवर ६०० ते ९०० कोटी रुपये खर्च करण्यात आला. उत्तर प्रदेशात पडलेल्या प्रत्येक मताचा खर्च साधारण ७५० रुपये होता आणि देशात हा सगळ््यात जास्त खर्च ठरला, असे पाहणीतून समोर आले.
या निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये २०० आणि आणि पंजाबमध्ये १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे अधिकाऱ्यांनी जप्त केले, असे या अभ्यासात म्हटले. जे पैसे जप्त करण्यात आले, त्यापेक्षा ४-५ पट पैसा प्रचारात फिरत होता. एका अंदाजानुसार २०१७ च्या निवडणुकीत मतदारांमध्ये अंदाजे एक हजार कोटी रुपये वाटले गेले. उत्तर प्रदेशात झालेल्या या पाहणीमध्ये ५५ टक्के मतदारांना त्यांच्या शेजारच्या किंवा परिचयाच्या लोकांनी या निवडणुकीत वा याआधीच्या निवडणुकांतही पैसे घेतले होते आणि त्यांनीच ते आम्हाला सांगितले, असे मान्य केले. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत दारोदार जाऊन, मेळावे, यात्रा, समाजमाध्यमे, दूरचित्रवाणीवरील व वृत्तपत्रांतील जाहिराती, मल्टी स्क्रीन प्रोजेक्शन्स, मोटारसायकल मेळावे, लंगर आणि प्रसिद्ध व्यक्तींचे कार्यक्रमांद्वारे प्रचार केला गेला.

नोटाबंदीनंतर वाढला प्रचार खर्च
नोटाबंदीच्या निर्णयाने प्रचाराचा खर्च लक्षणीयरीत्या वाढवला असल्याचे या अभ्यासातून समोर आले आहे. ज्या मतदार संघात निवडणूक अतिशय चुरशीची होती, तेथे मतदारांच्या संख्येवर, तसेच मतदारांचा प्रभाव किती, यावर ५०० ते २००० हजार रुपये ठरत होते, असे हा अभ्यास म्हणतो. दोन तृतीयांश मतदारांना उमेदवारांनी यापूर्वी खर्चले नसतील, एवढे पैसे खर्च केल्याचे आढळले.

Web Title: Uttar Pradesh's expenditure on promotion of Rs 5,500 crore!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.