प्रियकराचा साखरपुडा मोडायला आलेल्या प्रेयसीला भावाकडून बेदम मारहाण, मुलगी बेशुद्ध
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2023 06:14 PM2023-02-02T18:14:50+5:302023-02-02T18:18:27+5:30
प्रियकराचा साखरपुडा मोडायला आलेल्या प्रेयसीला तिच्याच भावाने बेदम मारहाण केली.
मेरठ : उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये प्रियकराचा साखरपुडा मोडायला आलेल्या प्रेयसीला तिच्याच भावाने बेदम मारहाण केली. संबंधित प्रेयसी तिच्या प्रियकराच्या घराबाहेर आंदोलन करत होती असे सांगितले जात आहे. त्याचवेळी तिचा भाऊ देखील तिथे पोहोचला. त्याने बहिणीला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिने न ऐकल्याने भावाने तिला मारहाण केली. भावाने केलेल्या मारहाणीमुळे तरूणी बेशुद्ध झाली. पोलिसांचे म्हणणे आहे की, अद्याप कोणतीही तक्रार आलेली नाही, तरीही या प्रकरणावर लक्ष ठेवले जात आहे.
दरम्यान, ही घटना मेरठमधील रोहता पोलीस स्टेशन क्षेत्रातील सटवाई गावातील आहे. इथे एका मुलीचे रिंकू नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते, असे सांगितले जात आहे. अशातच रिंकूचे नातेवाईक रिंकूचे इतरत्र लग्न करण्याचा विचार करत असल्याचे मुलीला समजले. मग संतापलेल्या तरूणीने प्रियकराचे घर गाठून त्याचा साखरपुडा मोडण्यासाठी धरणे आंदोलन करण्यासाठी त्याचे घर गाठले.
तरूणीला भावाकडून बेदम मारहाण
संबंधित मुलीच्या कुटुंबीयांनीही घटनास्थळी पोहोचून तिला खूप समजावून सांगितले. मात्र ती तिच्या निर्णयावर ठाम राहिली. यादरम्यान मुलीचा भाऊही तिथे पोहोचला होता. मग संतापलेला मुलीचा भाऊ आणि कुटुंबीयांनी मुलीला बेदम मारहाण केली, त्यामुळे ती बेशुद्ध झाली. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रकरण शांत केले. मुलीला उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मुलगी गंभीर जखमी
पोलीस अधिकारी ब्रिजेश सिंग यांनी सांगितले की, रोहताच्या सटवाई गावात एक मुलगी तिच्या प्रियकराच्या घरी धरणे धरून बसली होती. या मुद्द्यावरून वाद झाला आणि वाजाचे रूपांतर हाणामारीत झाले. यामध्ये मुलगी गंभीर जखमी झाली आहे. पोलिसांनी मुलीला रुग्णालयात दाखल केले आहे. या प्रकरणी अद्याप एकही अर्ज आलेला नाही. तरीदेखील कारवाई करण्यात आली असून पोलीस संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"