धक्कादायक! कोरोनामुळे भाजपा आमदाराचा मृत्यू; काही दिवसांपूर्वी पत्नीचे झाले होते निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2020 12:41 PM2020-11-12T12:41:02+5:302020-11-12T12:41:50+5:30
BJP MLA Surendra Singh Jeena : गेल्या दोन आठवड्यापासून दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात सुरेंद्र सिंह यांच्यावर उपचार सुरू होते.
नवी दिल्ली : उत्तराखंडमधील भाजपाआमदार सुरेंद्र सिंह जीना यांचे कोरोनामुळे निधन झाले. कोरोनाचे संक्रमण झाल्यामुळे आमदार सुरेंद्र सिंह यांच्यावर दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात उपचार सुरू होते. सुरेंद्र सिंह हे अल्मोडा जिल्ह्यातील सल्ट या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडणूक आले होते. तर गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांच्या पत्नीचे ह्रदयविकाराने निधन झाले होते.
आमदार सुरेंद्र सिंह यांना गेल्या काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. यानंतर गेल्या दोन आठवड्यापासून दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र त्यांची तब्येत दिवसेंदिवस अधिक खालावत होती. गुरुवारी उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
आमदार सुरेंद्र सिंह यांना उत्तराखंड भाजपाचा एक अनुभवी युवा चेहरा मानला जात होता. ते तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. सुरेंद्र सिंह यांच्या अचानक जाण्यामुळे उत्तराखंडमध्ये भाजपाला मोठा झटका बसला असून त्यांची पोकळी कधीही भरून न निघाणारी असल्याची भावना व्यक्त होत आहे.
Uttarakhand BJP MLA Surendra Singh Jeena (file photo) passes away at Sir Gangaram Hospital in Delhi, where he was undergoing treatment for #COVID19.
— ANI (@ANI) November 12, 2020
He was an MLA from Salt constituency in Almora district. His wife had passed away a few days back following a heart attack. pic.twitter.com/laDqlrriZ8
विकास मंडळाचे अध्यक्ष सुद्धा होते
सुरेंद्र सिंह हे 2006 मध्ये जीना कुमाऊं मंडळ विकास निगमच्या अध्यक्ष होते. 2007 मध्ये पहिल्यांदाच भिक्क्यासैंण या जागेवरून विधानसभेत आमदार म्हणून निवडून आले. 2012 रोजी पुन्हा सल्ट या विभागातून आमदार म्हणून निवडून आले. 2017 मध्ये पुन्हा एकदा त्यांनी विजय मिळवला होता. वयाच्या 50 व्या वर्षी सुरेंद्र सिंह यांचे कोरोनामुळे निधन झाले.