उत्तराखंडमध्ये सत्तेसाठी फोडाफोडीचे सत्र सुरू

By admin | Published: March 20, 2016 02:14 AM2016-03-20T02:14:16+5:302016-03-20T02:14:16+5:30

उत्तराखंडमधील सत्ताधारी काँग्रेसमधील एक गट फुटून भाजपाकडे गेल्याने येथील हरिश रावत सरकार संकटात सापडले असून, काँग्रेस बंडखोरांच्या मदतीने सरकार

In Uttarakhand, the campaign for power breakout started | उत्तराखंडमध्ये सत्तेसाठी फोडाफोडीचे सत्र सुरू

उत्तराखंडमध्ये सत्तेसाठी फोडाफोडीचे सत्र सुरू

Next

डेहराडून/नवी दिल्ली : उत्तराखंडमधील सत्ताधारी काँग्रेसमधील एक गट फुटून भाजपाकडे गेल्याने येथील हरिश रावत सरकार संकटात सापडले असून, काँग्रेस बंडखोरांच्या मदतीने सरकार स्थापनेचे भाजपाने प्रयत्न सुरू केले आहेत. रावत सरकार अल्पमतात आले असल्याने ते बरखास्त करावे, अशी मागणी भाजपाने राज्यपालांकडे केली आहे. मात्र राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना २८ मार्चपर्यंत बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे.
शनिवारी संध्याकाळी रावत यांनी फुटलेले काही आमदार परतल्याचा आणि भाजपाचे काही आमदारही आपल्याकडे असल्याचा दावा केला. आपण विधानसभेत बहुमत सिद्ध करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विधानसभाध्यक्षांनी पक्षांतरविरोधी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याची ताकीद दिली आहे. भाजपाच्या अविश्वास प्रस्तावाबाबत विचारले असता ते म्हणाले की, असा प्रस्ताव विधानसभेत आल्यावर त्याचा निर्णय घेतला जाईल.

काँग्रेस सरकार अस्थिर करण्याचा डाव
भाजपावर हल्लाबोल करताना राजकीय सत्ता आणि पैशाची लालूच दाखवून भाजपेतर सरकार अस्थिर करण्याचा डाव पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा खेळत असल्याचा आरोप काँग्रेसने केला. पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले की, मोदी-शहा जोडगोळी या देशातील निर्वाचित सरकारे बळजबरीने उलथून लावू पाहत आहे. अरुणाचल प्रदेशपाठोपाठ आता उत्तराखंडात हीच खेळी खेळली जात आहे.

काँग्रेसचे ९ बंडखोर भाजपाकडे
भाजपाचे नेते श्याम जाजू म्हणाले की, सरकार स्थापनेसाठी पक्षाजवळ पुरेसे संख्याबळ आहे. काँग्रेसचे ९ बंडखोर आमदार दिल्लीत पोहोचले असून, ते आमच्या संपर्कात आहेत.
राज्यपालांची भेट घेणार
पक्षांतरबंदी कायद्यान्वये बंडखोर आमदारांची संख्या कमी असली तरी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते विजय बहुगुणा हेही भाजपाकडे गेल्याने त्यांच्या जोरावरच सरकार स्थापनेसाठी भाजपा नेते प्रयत्नशील आहेत. त्यासाठी ते राज्यपालांची भेट घेणार आहेत.

Web Title: In Uttarakhand, the campaign for power breakout started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.