"अमेरिकेने 200 वर्षे भारताला गुलाम बनवलं आणि संपूर्ण जगावर राज्य केलं", तीरथ सिंह रावतांची मुक्ताफळं

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 10:07 AM2021-03-22T10:07:49+5:302021-03-22T10:08:08+5:30

Uttarkhand chief minister Tirath Singh Rawat : "कोरोना काळात अधिक धान्य मिळवण्यासाठी तुम्ही अधिक मुलं जन्माला का घालत नाही?" असा प्रश्न उपस्थितांना विचारल्याने पुन्हा एकदा नवा वाद निर्माण झाला. यानंतर आता पुन्हा एकदा रावत उत्तराखंडचे मुख्यमंत्री जोरदार चर्चेत आले आहेत.

uttarakhand cm tirath singh rawat new knowledge america who enslaved us for 200 years | "अमेरिकेने 200 वर्षे भारताला गुलाम बनवलं आणि संपूर्ण जगावर राज्य केलं", तीरथ सिंह रावतांची मुक्ताफळं

"अमेरिकेने 200 वर्षे भारताला गुलाम बनवलं आणि संपूर्ण जगावर राज्य केलं", तीरथ सिंह रावतांची मुक्ताफळं

Next

नवी दिल्ली - उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत (Tirath Singh Rawat) आपल्या वादग्रस्त विधानांमुळे सातत्याने चर्चेत येत आहे. आजकाल महिला फाटलेल्या जीन्स घालून फिरतात, हे सगळं बरोबर आहे का? हे कसले संस्कार आहेत" असं तीरथ सिंह रावत यांनी म्हटलं होतं. यानंतर सर्वांनी यावरून निशाणा साधत हल्लाबोल केला. तर रावत यांनी "कोरोना काळात अधिक धान्य मिळवण्यासाठी तुम्ही अधिक मुलं जन्माला का घालत नाही?" असा प्रश्न उपस्थितांना विचारल्याने पुन्हा एकदा नवा वाद निर्माण झाला. यानंतर आता पुन्हा एकदा रावत उत्तराखंडचे मुख्यमंत्री जोरदार चर्चेत आले आहेत. "अमेरिकेने 200 वर्षे भारताला गुलाम बनवलं आणि संपूर्ण जगावर राज्य केलं" अशी मुक्ताफळं उधळली आहेत. 

तीरथ सिंह रावत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भरभरून कौतुक केलं आहे. कोरोना काळात इतर देशांच्या तुलनेत भारताची स्थिती दिलासादायक असल्याचं म्हटलं आहे. "अमेरिकेने 200 वर्षे भारताला गुलाम बनवलं आणि संपूर्ण जगावर राज्य केलं. मात्र कोरोना काळात त्यांची स्थिती वाईट झाली. पावणे तीन लाखांपर्यंत तेथील मृत्यूदर पोहचला. अगदी कमी लोकसंख्या असलेला आणि आरोग्यात क्रमांक एकवर असलेल्या देशाचा मृत्यूदर 50 लाखांपेक्षा जास्त झाला. आजही परिस्थिती गंभीर आहे. हा देश पुन्हा लॉकडाऊनकडे प्रवास करत आहे" असं रावत यांनी म्हटलं आहे.

"देशाची स्थितीही वाईट झाली असती, पण मोदींनी आपल्याला मदत करण्याचं काम केलं. भारत 130-35 कोटी लोकसंख्येचा देश आहे. असं असलं तरी कोरोना काळात इतर देशांच्या तुलनेत भारताची स्थिती दिलासादायक आहे. मोदींनी आपल्याला वाचवण्याचं काम तर केलंच आहे, पण आपणही नियमांचं पालन केलं. जेव्हा मोदींनी म्हटलं की मास्क घाला, सॅनिटायझर वापरा, हात वारंवार धुवा, सोशल डिस्टन्सिंग ठेवा, तेव्हा लोकांनी हे सर्व केलं. त्यामुळेच आज भारताची स्थिती चांगली आहे" असं देखील तिरथ सिंह रावत यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

"जास्त धान्य मिळवण्यासाठी तुम्ही जास्त मुलं जन्माला का नाही घालत?", तीरथ सिंह रावतांचं पुन्हा वादग्रस्त विधान

रावत यांनी "कोरोना काळात अधिक धान्य मिळवण्यासाठी तुम्ही अधिक मुलं जन्माला का घालत नाही?" असा प्रश्न उपस्थितांना विचारला आहे. धान्यासाठी अधिक मुलं जन्माला घालण्याच्या विधानाने आता पुन्हा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. नैनीताल जिल्ह्यातील रामनगरमध्ये एका कार्यक्रमादरम्यान धान्यवाटपाविषयी बोलताना त्यांनी हे वादग्रस्त विधान केलं आहे. "कोरोना काळात प्रभावित झालेल्या प्रत्येक कुटुंबाला प्रती सदस्य 5 किलो धान्य मिळाले आहे. ज्यांच्या घरात 10 सदस्य आहेत त्यांना 50 किलो धान्य मिळालं. तसेच ज्यांच्या घरात 20 सदस्य आहेत त्यांना एक क्विंटल धान्य मिळालं. ज्या घरात 2 सदस्य आहेत त्यांना केवळ 10 किलो धान्य मिळाले. अनेक लोकांनी हे धान्य साठवलं आणि ते विकलं" असं रावत यांनी म्हटलं आहे. 

"...तरीही फाटक्या जीन्स वापरण्याला माझा विरोध"; जोरदार टीकेनंतरही तीरथ सिंह रावत आपल्या विधानावर ठाम

तीरथ सिंह रावत यांनी फाटक्या जीन्सबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावर आता पुन्हा एकदा आपली प्रतिक्रिया दिली आहे. "आपला महिलांनी जीन्स वापरण्याला विरोध नाही पण तरीही फाटक्या जीन्स वापरण्याला विरोध आहेच" असं रावत यांनी म्हटलं आहे. सर्वच स्तरातून टीका होत असताना रावत यांना त्यांच्या विधानाबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर माध्यमांशी बोलताना त्यांनी आपला महिलांनी फाटक्या जीन्स वापरण्याला विरोध कायम असल्याचं म्हटलं आहे. ट्विटरवर सध्या RippedJeans हा हॅशटॅग जोरदार ट्रेंड होत आहे.

Web Title: uttarakhand cm tirath singh rawat new knowledge america who enslaved us for 200 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.