माझ्या लेकाचं किमान एक बोट तरी आणून द्या रेss; उत्तराखंडमधील हतबल बापाची आर्त किंकाळी
By मोरेश्वर येरम | Published: February 12, 2021 03:09 PM2021-02-12T15:09:38+5:302021-02-12T15:12:01+5:30
Uttarakhand Disaster : जसजसा एक एक दिवस उलटतोय तसं टनेलमध्ये अडकलेल्यांना जीवंत बाहेर काढण्यासाठीच्या आशाही कमी होत जात आहेत.
उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळून झालेल्या दुर्घटनेत अडकेल्यांना बाहेर काढण्यासाठीच्या बचाव कार्याचा आज सहावा दिवस आहे. तपोवन टनलमध्ये अडकलेल्यांना वाचविण्यासाठी अनेक एजन्सी दिवसरात्र एक करुन काम करत आहेत. पण जसजसा एक एक दिवस उलटतोय तसं टनेलमध्ये अडकलेल्यांना जीवंत बाहेर काढण्यासाठीच्या आशाही कमी होत जात आहेत. (Uttarakhand Disaster Rescue Operation)
वाचण्याची आशाच सोडली; पण तितक्यात मोबाईल नेटवर्क काम करू लागलं अन्...
अनेक कुटुंबांनी तर आता टनेलमध्ये अडकलेल्या आपल्या कुटुंबातील सदस्य जीवंत असतील याच्या आशाही सोडून देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता कुटुंबियांनी आम्हाला आमच्या कुटुंबातील सदस्यांचे किमान मृतदेह तरी मिळवून द्या अशी आर्त हाक दिली आहे.
उत्तराखंड दुर्घटना हिमकडा कोसळून नाही, त्रिशूळ पर्वतामुळे; सॅटेलाईट फोटो आले
तपोवन टनेलमध्ये साचलेलं पुराचं पाणी आता कमी होऊ लागलं आहे. तर चिखल आणि साचलेला गाळ देखील कमी होतोय. टनेलमध्ये आणखी ३७ जण अडकल्याची शक्यता असून त्यांना बाहेर काढण्यासाठीचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती बचावकार्य करणाऱ्या एजन्सीच्या सदस्यांनी सांगितलं आहे. आतापर्यंत एकूण ३६ लोकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर एजूनही अनेक जण बेपत्ता आहेत.
कुटुंबियांच्या आशा मावळल्या
"मला माझ्या मुलाचं किमान एक बोट तरी आणून द्या. मला गावी जाऊन त्यावर अंत्यसंस्कार करायचे आहेत", असं एका मुलाचा बाप रडरडत म्हणाला. तपोवन टनेलमध्ये विजय सिंह हा वेल्डरचं काम करत होता. या दुर्घटनेत तो टनेलमध्येच अडकून पडला आहे. अद्याप त्याचा कोणताही ठावठिकाणा लागू शकलेला नाही. विजय सिंह याचे वडील टनेलच्या बाहेरच आपला मुलगा सुखरुप बाहेर येईल याची वाट पाहात बसले आहेत. पण आता सहा दिवसांनंतरही त्यांच्या मुलाचा काही पत्ता न लागल्यानं त्यांनी आर्त किंकाळी देत किमान आपल्या मुलाचं बोट तरी आणून द्या असं हतबलतेनं म्हटलं आहे.
विजय सिंह याच्यासारखेच दोन डझनहून अधिक जण टनेलमध्ये चिखलाच्या खाली गाडले गेल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, टनेलमध्ये अडकलेल्यांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाकडून शर्थीचे प्रयत्न सुरूच आहेत.