Uttarakhand Glacier Burst: हिमकडा दुर्घटनेतील १९७ जण बेपत्ताच
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2021 06:29 AM2021-02-10T06:29:52+5:302021-02-10T06:30:12+5:30
परिस्थितीवर केंद्र सरकारची उच्च पातळीवरून आणि स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची २४ तास देखरेख
नवी दिल्ली : उत्तराखंडमध्ये रविवारी हिमकडा कोसळून आलेल्या पुरात आजही १९७ जण बेपत्ता असून, २० जणांचा मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले आहेत, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत मंगळवारी सांगितले. परिस्थितीवर केंद्र सरकारची उच्च पातळीवरून आणि स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची २४ तास देखरेख आहे, असे सांगून शहा म्हणाले की, ही आकडेवारी राज्य सरकारकडून मिळालेली असून, तिच्यात काही बदल होऊ शकतो. मंगळवारी पाच मृतदेह हाती लागल्यामुळे मृतांची एकूण संख्या ३१ झाली आहे. बेपत्ता १९७ जणांमध्ये १३९ जण हे एनटीपीसीच्या बांधकाम सुरू असलेल्या प्रकल्पाचे, ४६ जण ऋषीगंगा प्रकल्पाचे, तर १२ ग्रामस्थ आहेत, असेही ते म्हणाले. एनटीपीसीचे १५ तर ऋषीगंगा प्रकल्पाचा एक कर्मचारी वाचवण्यात यश आले आहे. बोगद्यात अंदाजे २५ ते ३५ जण अडकले असावेत, असे शहा म्हणाले.