Uttarakhand Glacier Burst: हिमनदीचा पूर म्हणजे काय? हिमकडे कधी व का कोसळतात?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2021 05:47 AM2021-02-09T05:47:13+5:302021-02-09T05:48:28+5:30

उत्तराखंडात रविवारी हिमकडा कोसळून तीन हिमनद्यांना महापूर आला. या प्रयलयात ऋषीगंगा जलविद्युत प्रकल्प वाहून गेला.

Uttarakhand Glacier Burst What is Glacier Flood | Uttarakhand Glacier Burst: हिमनदीचा पूर म्हणजे काय? हिमकडे कधी व का कोसळतात?

Uttarakhand Glacier Burst: हिमनदीचा पूर म्हणजे काय? हिमकडे कधी व का कोसळतात?

Next

उत्तराखंडात रविवारी हिमकडा कोसळून तीन हिमनद्यांना महापूर आला. या प्रयलयात ऋषीगंगा जलविद्युत प्रकल्प वाहून गेला. अनेक घरांचे नुकसान झाले. जीवितहानीही झाली. परंतु ज्यामुळे ही आपत्ती ओढवली त्याचं कारण काय आणि ते कसं घडलं याची माहिती जाणून घेऊ या...

हिमकडे कधी व का कोसळतात?
हिमकडे कोसळण्याची अनेक कारणे असू शकतात. त्यात मुख्यत्वे हिमकड्याची झीज होणे, पाण्याचा दाब वाढणे, हिमस्खलन किंवा भूस्खलन होणे आणि बर्फाखाली भूकंप होणे इत्यादी कारणांचा समावेश असतो. 

अचानक पूर येण्यामागे कारण काय?
हिमनद्यांना बांध घालून पाणीसाठा केला जातो. मात्र, अचानक हिमकडा कोसळल्याने पूर येऊन पाण्याची पातळी वाढते. अशा परिस्थितीत धरणाचे दरवाजे उघडून अतिरिक्त पाण्याला वाट करून द्यावी लागते. हिमकडा कधीही कोसळू शकतात. त्यामुळे हिमनद्यांना कधी पूर येईल, याचा काही नेम नसतो. सतत सतर्क रहावे लागते.

हिमनदीला पूर कशामुळे आला?
हिमनदीला लागून असलेला हिमकडा कोसळल्याने धौलीगंगा नदीला महापूर आला. या महापुरात नदी परिसरात असलेल्या जलविद्युत प्रकल्पाचे मोठे नुकसान झाले. मोठी जीवितहानी झाल्याची भीतीही व्यक्त होत आहे. 

हिमकड्याच्या परिसरात एखादा नजीकचा हिमकडा कोसळल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचे असंतुलन निर्माण झाले तर दुसऱ्या हिमकड्यावर त्याचा परिणाम होतो. 

हिमकडा नदीत कोसळल्यानंतर पाण्याचा वेग एवढा प्रचंड असतो की पाण्याचा हा लोंढा मार्गात येणारी प्रत्येक गोष्ट उद्ध्वस्त करत जातो.

तज्ज्ञांचे म्हणणे...   
अतिपाऊस वा बर्फ वितळणे, भूकंप, बर्फाची झीज, धरणाची झीज आणि हिमनदीच्या रचनेत अचानक बदल होणे इत्यादी कारणांमुळे हिमकडे कोसळण्याचे प्रकार घडू शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

हिमकडा कोसळल्याने पाण्याचा अतिसंचय झाल्यास अतिरिक्त पाणी सोडण्यात येते. ते तासागणिकही असू शकते वा दिवसागणिकही असू शकते. 

Web Title: Uttarakhand Glacier Burst What is Glacier Flood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.