उत्तर प्रदेशातील मदरशांमध्ये राष्ट्रगीत म्हणावेच लागणार - हायकोर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2017 09:42 PM2017-10-04T21:42:06+5:302017-10-04T21:44:24+5:30
ठळक मुद्दे राष्ट्रगीत हे जात, धर्म आणि भाषाभेदांपलिकडचे राष्ट्रगीत गाण्यापासून सूट मिळणार नाही मदरशांकडून घेण्यात आलेले आक्षेप फेटाळून लावले
इलाहाबाद - मदरशांमध्ये राष्ट्रगीत सक्तीचे करण्याच्या उत्तर प्रदेशातील आदित्यनाथ योगी सरकारच्या निर्णयावर आता हायकोर्टानेही शिक्कामोर्तब केले आहे. योगी सरकारच्या याचिकेला आव्हान देणारी याचिका अलाहाबाद हायकोर्टाने आज फेटाळून लावली. राष्ट्रगीत आणि तिरंग्याचा सन्मान करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असे सांगत हायकोर्टाने मदरशांना राष्ट्रगीत गाण्यापासून सूट मिळणार नाही असे स्पष्ट केले आहे.
Allahabad High Court rejects plea seeking relief for Madrasas in UP from singing national anthem.
— ANI UP (@ANINewsUP) October 4, 2017
राष्ट्रगीत आणि तिरंग्याचा सन्मान संवैधानिक कर्तव्य आहे. त्यामुळे राष्ट्रगीत हे जात, धर्म आणि भाषाभेदांपलिकडचे आहे, असे ठणकावून सांगत हायकोर्टाने मदरशांकडून घेण्यात आलेले आक्षेप फेटाळून लावले. हायकोर्टाच्या या निर्णयानंतर आता उत्तर प्रदेशातील मदरशांसाठी राष्ट्रगीत बंधनकारक झाले आहे.
याआधी 15 ऑगस्टला मदरशांमध्ये ध्वजारोहण आणि तिरंग फडकावण्याचा कार्यक्रम आयोजित करावा आणि त्याचे चित्रिकरणही करावे अशा उत्तर प्रदेश सरकारच्या आदेशाबाबत वाद निर्माण झाला होता. त्यावेळी मुस्लीम संघटनांनी उत्तर प्रदेश सरकारवर मुस्लिमांच्या देशभक्तीवर संशय निर्माण केला जात असल्याचा आरोप केला होता.