...म्हणून उत्तराखंडच्या पर्यटनमंत्र्यांनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांना पाठवलं 'रामायण'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2020 10:52 AM2020-07-08T10:52:24+5:302020-07-08T10:58:36+5:30

उत्तराखंडचे पर्यटनमंत्री सतपाल महाराज यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना  रामायण या प्राचीन ग्रंथाची एक प्रत पाठवली आहे.

uttarakhand minister satpal maharaj sents ramayana china president galwanclash | ...म्हणून उत्तराखंडच्या पर्यटनमंत्र्यांनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांना पाठवलं 'रामायण'

...म्हणून उत्तराखंडच्या पर्यटनमंत्र्यांनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांना पाठवलं 'रामायण'

Next

नवी दिल्ली - पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यामध्ये चीनशी झालेल्या संघर्षात भारतीय लष्कराचे 20 जवान शहीद झाले. त्यानंतर चीनविरोधातभारतामध्ये संतापाची लाट उसळली आहे. याच दरम्यान उत्तराखंडचे पर्यटनमंत्री सतपाल महाराज यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना  रामायण या प्राचीन ग्रंथाची एक प्रत पाठवली आहे. तसेच सतपाल महाराज यांनी जिनपिंग यांना रावणाच्या विस्तारवादी विचारसरणीमुळे झालेल्या नुकसानीवरून धडा घेण्याचा सल्लाही दिला आहे. 

भारत आणि चीन सैनिकांमध्ये गलवान खोऱ्यात संघर्ष झाला.  भारतीय सीमेवरील गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांच्या हल्ल्यात भारताचे 20 जवान शहीद झाले. काही वृत्तसंस्था व वृत्तवाहिन्यांनी भारताने या कारवाईला जशास तसे उत्तर देत चीनचे 43 सैनिक मारल्याचा दावाही केला आहे. मात्र चीनने अद्याप मृतांचा आकडा जाहीर केलेला नाही. यानंतर आता सतपाल महाराज यांनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांना रामायण पाठवलं आहे. रावणाच्या विस्तारवादी विचारसरणीमुळे त्याचा कोणता परिणाम झाला हा संदेश चीनच्या राष्ट्रध्यक्षांपर्यंत पोहोचवायचा असल्याने त्यांना रामायण हा ग्रंथ पाठवल्याचं सतपाल यांनी सांगितलं.

"चीनच्या सैनिकांनी ज्याप्रकारे गलवान खोऱ्यात आपल्या विस्तारवादी विचारणीमुळे भारतीय जवानांवर हल्ला केला तो प्रकार अतिशय निषेधार्ह आहे" असं सतपाल महाराज यांनी म्हटलं आहे. तसेच विस्तारवादी व्यक्ती किंवा विस्तारवादी देशाची कधीही भरभराट होत नाही. चीनचे राष्ट्राध्यक्ष रामायणातून काही बोध घेऊन बदल करतील अशी अपेक्षा असल्याचं देखील म्हटलं. "जी व्यक्ती विस्तारवादी विचारसणीचा अवलंब करते त्याचा अंत कसा होतो हे रामायणातून सांगण्यात आलं आहे. सध्या चीनचं सरकार जनतेचा मोठ्या प्रमाणात पैसा हा सैन्याची ताकद वाढवण्यावर खर्च करत आहे. ज्या आजाराने आज संपूर्ण जग त्रस्त आहे असा आजार थांबवण्यासाठी हा पैसा खर्च करावा" असंही सतपाल महाराज यांनी सांगितलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

देशभरात चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे. अनेकांनी तर आपल्या फोनमधून चिनी अ‍ॅप्स देखील हटवून याची सुरुवात केली होती. याच दरम्यान केंद्रातील मोदी सरकारने चीनला मोठा दणका दिला. लोकप्रिय अ‍ॅप टिकटॉकसह 59 चिनी अ‍ॅप्सवर मोदी सरकारने बंदी घातली. यानंतर आता केंद्र सरकार आणखी एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. भारत आणि चीनदरम्यान असलेल्या तणावानंतर भारतात गुंतवणूकीसाठी आलेल्या 50 चीनी कंपन्यांच्या प्रस्तावावर फेरविचार करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. हा निर्णय झाला तर तो चीनला आणखी एक मोठा दणका असू शकतो असं म्हटलं जात आहे. देशात केंद्र सरकारने नवीन स्क्रीनिंग पॉलिसी आणली आहे. यामध्ये भारताच्या शेजारच्या देशांना भारतात कुठेही गुंतवणूक करायची असल्यास त्यांना आधी केंद्र सरकारची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

"राहुल गांधी काही डॉक्टर नाहीत", 'त्या' आरोपांवर थेट कंपनीने दिलं प्रत्युत्तर

"मी महाराज किंवा टायगर नाही, कमलनाथ आहे; कोण मांजर आणि कोण उंदीर हे जनता ठरवेल"

सावधान! 3 वर्षांनी पुन्हा आलाय 'हा' खतरनाक Android Virus; फक्त एक मेसेज अन्...

धक्कादायक! "माझी हत्या होऊ शकते", कोरोनाग्रस्त पत्रकाराच्या आत्महत्येनंतर 'ते' चॅट व्हायरल

राहुल गांधींनी पुन्हा एकदा साधला मोदी सरकारवर निशाणा, 'हे' प्रश्न विचारत केला हल्लाबोल

कामासाठी काय पण! लग्न मंडपातच नवरीने घेतला लॅपटॉप अन्...; Video तुफान व्हायरल

 

Web Title: uttarakhand minister satpal maharaj sents ramayana china president galwanclash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.