...तर भारतात पुन्हा ब्रिटनसारखी आणीबाणी, १४ लाख बाधित आढळतील; व्ही. के. पॉल यांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2021 09:57 AM2021-12-20T09:57:00+5:302021-12-20T09:59:11+5:30
थंडीमध्ये ओमायक्रॉनचा फैलाव झपाट्याने होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क : ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने आता जगभरात आपले हात-पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. ब्रिटनमध्ये तर आणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे. तिथे ओमायक्रॉन झपाट्याने पसरत आहे. निती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी ब्रिटनसारखी स्थिती आपल्याकडे निर्माण झाल्यास दिवसाला १४ लाख एवढे बाधित आढळतील, असा इशारा दिला आहे. जाणून घेऊ.. ब्रिटनचे काय चुकले?
- ओमायक्रॉनच्या फैलावाचा ब्रिटनमधील वेग पाहता भारतात अशी स्थिती आल्यास दररोज १४ लाख बाधित आढळतील, असे निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी म्हटले आहे.
- थंडीमध्ये ओमायक्रॉनचा फैलाव झपाट्याने होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर सावधान राहून कोरोनानियमांचे पालन करणे गरजेचे असून ब्रिटनसारखे बेसावध राहून चालणारे नाही, असे डॉ. पॉल यांनी स्पष्ट केले आहे.
बूस्टर डोस तारणार का?
- ब्रिटनमध्ये बूस्टर डोस देणे सुरू केले केले आहे.
- ७ लाखांहून अधिक लोकांनी एकाच दिवसात बूस्टर डोस घेतला आहे. ही संख्या रोज झपाट्याने वाढत आहे.
- ८५ टक्के एवढी या बूस्टर डोसची परिणामकारकता आहे. म्हणजे बूस्टर डोस घेतल्यास कोरोना होण्याची शक्यता ८५ टक्के मावळते.
ब्रिटनचे चुकले काय?
- ओमायक्रॉन या विषाणूचा प्रसार झपाट्याने होत असला तरी ब्रिटनमध्ये काही महिन्यांपासून निर्बंध शिथील करण्यात आलेले आहेत.
- अनेक ठिकाणी तिथे मास्क सक्तीचा नव्हता. त्यामुळे लोकांमध्ये कोरोनाची भीती राहिली नव्हती.
- कोरोना नियम बऱ्याच प्रमाणात शिथिल करण्यात आले होते.
- आता ओमायक्रॉनमुळे ब्रिटनमध्ये दहशतीचे वातावरण असून तेथे आणीबाणीसदृश स्थिती निर्माण झाली आहे.