गिलगिट बाल्टिस्तान तत्काळ खाली करा; भारताचा पाकिस्तानला गंभीर इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2020 04:25 PM2020-05-04T16:25:43+5:302020-05-04T16:29:01+5:30

गिलगिट बाल्टिस्तानवरून पाकिस्तानच्या दिल्लीतील उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्याला बोलावून परराष्ट्र मंत्रालयाने नाराजी व्यक्त केली आहे.

vacate Gilgit Baltistan immediately; India's warning to Pakistan hrb | गिलगिट बाल्टिस्तान तत्काळ खाली करा; भारताचा पाकिस्तानला गंभीर इशारा

गिलगिट बाल्टिस्तान तत्काळ खाली करा; भारताचा पाकिस्तानला गंभीर इशारा

googlenewsNext

नवी दिल्ली : येत्या काही दिवसांत गिलगिट बाल्टिस्तानवरून भारत-पाकिस्तानमध्ये तणाव पेटण्याची शक्यता आहे. सोमवारी भारताने गिलगिट बाल्टिस्तानमध्ये निवडणूक घेण्याच्या पाकिस्तानी न्यायालयाच्या निर्णयावर संतप्त कार्यवाही केली आहे. भारताने यावर कडक शब्दांत नाराजी व्यक्त केली असून लवकरात लवकर हा भाग खाली करण्याचे पाकिस्तानला बजावले आहे. 


गिलगिट बाल्टिस्तान हा भारताचा अविभाज्य भाग असून पाकिस्तानच्या न्यायपालिकेला त्यावर निर्णय घेण्याचा कोणताही अधिकार नाहीय. या भागाला पाकिस्तानने रिकामे करावे, अशा शद्बांत भारताने पाकिस्तानला सुनावले आहे. 
जम्मू काश्मीरच्या नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत आहे. काल दहशतवादी हल्ल्यात एका मेजरसह पाच जवान शहीद झाले होते. पाकिस्तानला कोरोनाने घेरलेले असूनही दहशतवाद्यांना कारवायांसाठी उकसाविण्यात येत आहे. गिलगिट बाल्टिस्तान हा देखील याच योजनेचा भाग असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. जगाचे लक्ष कोरोनावर असताना त्यांना काश्मीरमधील गोळीबारावर गुंतवून ठेवत गिलगिट बाल्टिस्तानमध्ये निवडणुका घेण्याचा कट रचला जात आहे. यामुळेच सीमेपलिकडून कोणतेही कारण नसताना गोळीबार करण्यात येत आहे. भारताच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानला मोठे नुकसान झेलावे लागत आहे. 


गिलगिट बाल्टिस्तानवरून पाकिस्तानच्या दिल्लीतील उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्याला बोलावून परराष्ट्र मंत्रालयाने नाराजी व्यक्त केली आहे. त्याला जम्मू काश्मीरसह गिलगिट बाल्टिस्तान आणि लडाख हे भारताचे अधिकृत क्षेत्र आहे. पाकिस्तानने गिलगिट बाल्टिस्तानवर अनधिकृतरित्या ताबा घेतलेला आहे. यामुळे त्यांना न्यायपालिकेद्वारे निर्णय घ्यायचा अधिकार नाही. जम्मू काश्मीरचा भागही तात्काळ खाली करावा अशा शब्दांत पाकिस्तानला सुनावले आहे. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

CoronaVirus लॉकडाऊनमध्ये भारतासारखीच सूट दिली; 'या' देशांमध्ये कोरोनाचा धोका वाढला

कुलभूषण जाधवसाठी अजित डोवालांचे मागच्या दाराने प्रयत्न; हरीष साळवेंचा गौप्यस्फोट

IFSC केंद्र नेमके आहे तरी काय? गिफ्ट सिटीचा मालक कोण? जाणून घ्या...

लॉकडाऊन वाढला! तुमच्या कारने मेन्टेनन्सला नाही दमवले म्हणजे मिळवले

 

 


 

Web Title: vacate Gilgit Baltistan immediately; India's warning to Pakistan hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.