सुट्ट्या पैशांवरून झाली बाचाबाची, बस कंडक्टरने चालत्या बसमधून मारली उडी
By admin | Published: September 26, 2016 02:49 PM2016-09-26T14:49:41+5:302016-09-26T14:51:10+5:30
महिला प्रवाशासोबत पैशांवरून झालेल्या बाचाबाचीनंतर बसच्या कंडक्टरने चक्क चालत्या बसमधून नदीत उडी मारली
Next
>ऑनलाइन लोकमत
मंगळुरू, दि. 26- कर्नाटक स्टेट टुरीझमच्या बसमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. महिला प्रवाशासोबत पैशांवरून झालेल्या बाचाबाचीनंतर बसच्या कंडक्टरने चक्क चालत्या बसमधून नदीत उडी मारली. मंगळुरूहून सुब्रमण्याला जाणा-या बसमध्ये ही घटना घडली. देविदास शेट्टी (41) असं त्या कंडक्टरचं नाव आहे.
सुब्रमण्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बसमधील एका महिला प्रवाशाने शेट्टी यांच्याकडे 500 रूपये दिले होते असं सांगत पैसे परत देण्याची मागणी केली. त्यावर शेट्टी यांनी महिलेला तुम्ही 100 रूपये दिल्याचं सांगितलं. त्यावरून दोघांमध्ये बाचाबाचीला सुरूवात झाली. त्यानंतर हे प्रकरण इतकं वाढलं की त्यांना काबाडा पोलिस स्थानकात जायला लागलं. पोलिसांनी शेट्टीच्या बॅगेतील पैशांची मोजणी केली असता 500 रूपये जास्त आढळून आले. त्यानंतर शेट्टी यांनी महिलेची माफी मागितली व बसचा पुढचा प्रवास सुरू झाला. मात्र, बस कुमारधारा नदीजवळ आली असता शेट्टी यांनी थेट चालत्या बसमधून नदीत उडी मारून आत्महत्या केली.
शेट्टी यांच्या तिकीटाच्या बॅगमध्ये चिट्ठी मिळाली, त्यावर आत्मसन्मानाला तडा गेली असल्याने आता जगण्यात काही अर्थ नाही असं लिहीलं होतं.