12 मुलांच्या मृत्यूला कोण जबाबदार? बडोदा बोट दुर्घटनेवर पोलिसांची अ‍ॅक्शन, 18 जणांविरुद्ध FIR

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 10:13 AM2024-01-19T10:13:39+5:302024-01-19T10:14:45+5:30

Vadodara Boat Accident : या दुर्घटनेत 12 विद्यार्थी आणि 2 शिक्षकांचा मृत्यू झाला आहे.

Vadodara boat accident Who is responsible for the death of 12 children Police in action mode FIR against 18 persons | 12 मुलांच्या मृत्यूला कोण जबाबदार? बडोदा बोट दुर्घटनेवर पोलिसांची अ‍ॅक्शन, 18 जणांविरुद्ध FIR

12 मुलांच्या मृत्यूला कोण जबाबदार? बडोदा बोट दुर्घटनेवर पोलिसांची अ‍ॅक्शन, 18 जणांविरुद्ध FIR

गुजरातमधील बडोदा येथे झालेल्या बोट दुर्घटनेनंतर पोलिसांनी आता मोठी अ‍ॅक्शन घेतली आहे. बडोदा येथील हर्णी तलावात गुरुवारी बोट उलटून 14 जणांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी 18 जणांविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. या दुर्घटनेत 12 विद्यार्थी आणि 2 शिक्षकांचा मृत्यू झाला आहे.

हे विद्यार्थी येथे पिकनिकसाठी आले होते. ते या तलावात बोटिंग करत असताना दुपाही ही दुर्घटना घडली. यासंदर्भात माहिती देताना अधिकाऱ्याने म्हटले होते की, बोटीत एकूण 27 लोक बसले होते. यांत 23 विद्यार्थी आणि चार शिक्षकांचा समावेश होता. गुजरात सरकारने या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले असून बडोदा जिल्हाधिकाऱ्यांना 10 दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देशही दिले आहेत.

लाइफ जॅकेटशिवाय प्रवास -
महत्वाचे म्हणजे, बोटचालकाने या लोकांना लाइफ जॅकेटशिवाय बोटमध्ये बसवले होते. क्षमतेपेक्षा अधिक जणांना बोटीवर बसवल्याने ती उलटली. माहिती मिळताच अग्निशमन आणि एनडीआरएफच्या पथकाने घटनास्थळी बचावकार्य सुरू केले. 

सुरुवातीला सहा विद्यार्थ्यांचे मृतदेह सापडले, तर अनेक जण बेपत्ता होते. काही वेळाने 14 विद्यार्थ्यांसह दोन शिक्षकांचे मृतदेह हाती लागले. सदर घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला. मृतांच्या वारसदारांना 2 लाखांची, तर जखमींना 50 हजारांची मदत जाहीर केली आहे.

Web Title: Vadodara boat accident Who is responsible for the death of 12 children Police in action mode FIR against 18 persons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.