वैष्णोदेवीचे दर्शन आता आणखी सोपे, गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी मंदिर बोर्डाने उचलले महत्त्वाचे पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 06:24 AM2024-01-31T06:24:34+5:302024-01-31T06:25:08+5:30

Vaishnodevi Mandir: कटरा येथील वैष्णोदेवी मंदिरात दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येत असतात. त्यांच्या लांब रांगांचे व्यवस्थापन करण्यासाठी, तसेच गोंधळाची परिस्थिती निर्माण होणे टाळण्यासाठी श्री माता वैष्णोदेवी श्राइन बोर्डाने (एसएमव्हीडीएसबी) महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. 

Vaishnodevi darshan now easier, temple board takes important step to manage crowd | वैष्णोदेवीचे दर्शन आता आणखी सोपे, गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी मंदिर बोर्डाने उचलले महत्त्वाचे पाऊल

वैष्णोदेवीचे दर्शन आता आणखी सोपे, गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी मंदिर बोर्डाने उचलले महत्त्वाचे पाऊल

जम्मू - कटरा येथील वैष्णोदेवी मंदिरात दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येत असतात. त्यांच्या लांब रांगांचे व्यवस्थापन करण्यासाठी, तसेच गोंधळाची परिस्थिती निर्माण होणे टाळण्यासाठी श्री माता वैष्णोदेवी श्राइन बोर्ड (एसएमव्हीडीएसबी) कटरा रेल्वे स्थानकावर भाविकांच्या नोंदणीसाठी रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेन्टिफिकेशन (आरएफआयडी) यंत्रणा लवकरच कार्यान्वित करणार आहे. 

एसएमव्हीडीएसबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंशुल गर्ग यांनी सांगितले की, भाविकांची सुरक्षा, तसेच त्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून देणे, त्यांची गैरसोय टाळणे हे आमच्या देवस्थानाचे कर्तव्य आहे. त्यामुळे भाविकांच्या नोंदणीची ही प्रक्रिया आम्ही कटरा रेल्वे स्थानकावर सुरू करणार आहोत. श्री वैष्णोदेवी मंदिराच्या परिसरात अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अंशुल गर्ग प्रयत्नशील आहेत. वैष्णोदेवीची महती सांगणारा ‘माता की कहानी’ हा लेझर शो वैष्णोदेवी मंदिरापासून जवळच असलेल्या बाणगंगा येथे भाविकांसाठी सुरू करण्याचा विचार आहे. तसेच, वैष्णोदेवी परिसरातील अधकुवारी भागात कोणत्याही वेळेस सुमारे २५०० ते ३००० भाविक सामावले 
जातील इतक्या सुविधा निर्माण करण्यात येतील.

९५.२२ लाख भाविक
२०२३ मध्ये वैष्णोदेवी मंदिरात ९५.२२ लाख भाविक दर्शनासाठी आले होते. या भाविकांच्या संख्येचा उच्चांक होता. माता वैष्णोदेवी भवन येथे सुरू केलेला स्कायवॉक, पार्वती भवनाची केलेली पुनर्बांधणी यामुळे भाविकांच्या वाढत्या संख्येला सामावून घेणे शक्य झाले आहे.

नव्या वैष्णवी भवनाची उभारणी सुरू
नव्या वैष्णवी भवनाची उभारणी सुरू असून त्यात दररोज ३०० भाविक राहू शकतील. या इमारतीत भोजनालय, प्रसाधनगृह अशा अनेक सुविधा भाविकांसाठी उपलब्ध करून देण्यात येतील. अयोध्येतील राममंदिर, उज्जैन येथील महाकालेश्वर धाम, अमृतसर येथील सुवर्णमंदिर यांच्या धर्तीवर वैष्णोदेवी मुख्य भवन, अधकुवारी, दर्शनी देवडी यांच्या दर्शनी भागांत विविध रंगाच्या एलईडी दिव्यांची भव्य रोषणाई करण्यात येणार आहे.

Web Title: Vaishnodevi darshan now easier, temple board takes important step to manage crowd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.