हरिद्वारमध्ये वाजपेयींच्या अस्थींचं केलं विसर्जन, अमित शाह, राजनाथ सिंहांबरोबर अनेक दिग्गजांची उपस्थिती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2018 10:42 AM2018-08-19T10:42:30+5:302018-08-19T14:00:09+5:30
देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींचं आज अस्थि विसर्जन होणार आहे. दुपारी साडेबारा ते दीड वाजेपर्यंत अस्थि विसर्जनाचा कार्यक्रम करण्यात येणार आहे.
हरिद्वार- माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थी हरिद्वारमधल्या ब्रह्मकुंडमध्ये विसर्जित करण्यात आल्या आहेत. वाजपेयींची मानस कन्या नमिता हिने त्यांच्या अस्थी गंगा नदीत विसर्जित केल्या आहेत. तत्पूर्वी अटल बिहारी वाजपेयींची अस्थिकलश यात्रा काढण्यात आली होती. दरम्यान भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते अस्थी विसर्जन कार्यक्रमाला उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमात भाजपाचे 15 हजार कार्यकर्ते सहभागी झाले होते. हरिद्वारमध्ये दोन किलोमीटरपर्यंत लांब अस्थी विसर्जन यात्रा निघाली असून, त्या यात्रेत स्थानिक माणसे सहभागी झाली होती.
दिल्लीतल्या स्मृती स्थळी ठेवण्यात आलेल्या अस्थींचं वेगवेगळ्या कलशांमध्ये विभाजन करण्यात आलेलं होतं. हरिद्वारमधल्या पवित्र नद्यांमध्ये या अस्थी विसर्जित केल्या गेल्या आहेत. वाजपेयींच्या अस्थी देशभरातल्या 100 नद्यांमध्ये विसर्जित केल्या जाणार आहेत.
Late #AtalBihariVajpayee's daughter Namita and granddaughter Niharika arrive at Smriti Sthal in Delhi to collect ashes of the former prime minister pic.twitter.com/l9WOZCx6U7
— ANI (@ANI) August 19, 2018
अटलबिहारी वाजपेयींच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिल्लीतल्या जाधव स्टेडियममध्ये सोमवारी सर्वदलीय प्रार्थना सभा होणार आहे. सर्व राज्यांतील राजधान्यांमध्ये प्रार्थना सभांचं आयोजन केलं जाणार आहे. अटलजींचं अस्थिकलश शांतिकुंजचे संस्थापक पं. श्रीराम शर्मा आचार्य आणि माता भगवती देवींच्या समाधीस्थळी ठेवण्यात येणार आहे.
#WATCH: Late #AtalBihariVajpayee's daughter Namita immerses his ashes in Ganga river at Har-ki-Pauri in Haridwar. Granddaughter Niharika, Home Minister Rajnath Singh and BJP President Amit Shah also present. #Uttarakhandpic.twitter.com/ETBCsAF3Dp
— ANI (@ANI) August 19, 2018