वाराणसीत मोदींच्या कार्यक्रमात घोषणाबाजी
By admin | Published: February 22, 2016 02:08 PM2016-02-22T14:08:15+5:302016-02-22T14:08:15+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित असलेल्या बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमधील कार्यक्रमात काही लोकांनी जबरदस्ती आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला, तर एका विद्यार्थ्याने घोषणाबाजी केली आहे
Next
ऑनलाइन लोकमत -
वाराणसी, दि. 22 - पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित असलेल्या बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमधील कार्यक्रमात काही लोकांनी जबरदस्ती आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला, तर एका विद्यार्थ्याने घोषणाबाजी केली आहे. नरेंद्र मोदींच्या भाषणाला सुरुवात होताच एका विद्यार्थ्यांने घोषणा देण्यास सुरुवात केली. पोलिसांनी लगेचच त्या विद्यार्थ्याला बाहेर काढलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणीस दौ-यावर आहेत. आज बनारस हिंदू युनिव्हर्सिटीच्या पदवीदान समारंभात मोदी उपस्थित होते. मोदींच्या भाषणाला सुरुवात होताच एका विद्यार्थ्य़ांना विद्यार्थी संघटना पुनरुज्जीवीत करण्याची तसंच निवडणुका घेण्याची मागणी करत घोषणाबाजी केली. पोलिसांनी त्या विद्यार्थ्याला पकडून बाहेर नेले. मात्र बाहेर नेत असताना उपस्थितांपैकी कोणीतरी त्याच्यावर हात उचलल्याची माहिती एएनआयने दिली आहे.
तर दुसरीकडे बहूजन मुक्ती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी रोहीत वेमुला प्रकरणी आंदोलन करत आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज करावा लागला. पोलिसांनी याप्रकरणी 6 जणांना अटक केली आहे.
WATCH:Student in PM's program in BHU raises slogans,demands revival of Student union, slapped by someone in audiencehttps://t.co/SyaeOpKWP0
— ANI (@ANI_news) February 22, 2016