वंदे भारत! चीनला रेल्वेचा आणखी एक झटका; 1500 कोटी रुपयांची निविदा रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 08:54 AM2020-08-22T08:54:04+5:302020-08-22T08:54:40+5:30
अत्याधुनिक रेल्वे कोच बनविणारी सरकारी कंपनी इंटीग्रेटेड कोच फॅक्टरी (ICF) ने सेमी हायस्पीड ट्रेनच्या 44 कोच बांधणीशी संबंधित निविदा रद्द केली आहे.
लडाखमध्ये चीनच्या सैनिकांनी धोक्याने भारतीय जवानांवर हल्ला केला होता. यात भारताचे 20 जवान शहीद झाले होते. यानंतर रेल्वेने चिनी कंपनीचे कंत्राट रद्द केले होते. आज पुन्हा देशाची महत्वाची रेल्वे सेवा मानली जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसशी संबंधीत कामामध्ये चिनी कंपनीचे नाव समोर आल्याने निविदाच रद्द केली आहे.
अत्याधुनिक रेल्वे कोच बनविणारी सरकारी कंपनी इंटीग्रेटेड कोच फॅक्टरी (ICF) ने सेमी हायस्पीड ट्रेनच्या 44 कोच बांधणीशी संबंधित निविदा रद्द केली आहे. सेमी हाय-स्पीड ट्रेन वंदे भारत एक्सप्रेससाठी मागविण्यात आलेल्या जागतिक निविदेमध्ये चीनची सरकारी कंपनी सहभागी झाली होती. ही निविदा रद्द करत आठवड्याभरात नवीन निविदा जारी करण्यात येणार असून भारतीय कंपनीला किंवा मेक इन इंडियाला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे रेल्वेने म्हटले आहे.
रेल्वेने 44 प्रोपल्सन सिस्टिमसाठी ही निविदा मागविली होती. यासाठी चीनची सरकारी कंपनी CRRC योंगजी इलेक्ट्रिक कंपनी लिमिटेडसहभागी झाली होती. CRRC व गुडगावच्या पायोनियर इलेक्ट्रिक इंडिया प्राइवेट लिमिटेड या भारतीय कंपनीसोबत भागीदारी होती. या दोन्ही कंपन्या भारतात एकत्र काम करतात. मात्र, निविदेत भारतीय कंपनीचे नाव होते.
CRRC शिवाय बोली लावणाऱ्या पाच कंपन्यांमध्ये भारत सरकारची भारत हेव्ही इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL), भारत इंडस्ट्रीज संगरूर, इलेक्ट्रोवेव्स इलेक्ट्रॉनिक्स (पी) लिमिटेड, मेधा सर्वो ड्राइव्स प्राइवेट लिमिटेड व पॉवरनेटिक्स इक्विपमेंट इंडिया प्राइवेट लिमिटेड या कंपन्या सहभागी झाल्या होत्या.
Tender for manufacturing of 44 nos of semi high speed train sets (Vande Bharat) has been cancelled.
— Ministry of Railways (@RailMinIndia) August 21, 2020
Fresh tender will be floated within a week as per Revised Public Procurement (Preference to Make in India) order.
रेल्वेने टेंडर रद्द करण्याची कारणे सांगितली नसली तरीही अधिकाऱ्यांनुसार पहिली ट्रेन 18 बनविण्यासाठी 100 कोटी रुपये खर्च आला होता. यामध्ये 35 कोटी रुपये प्रोपल्सन सिस्टिमसाठीच लागले होते. याचा हिशेब पाहता 40 ट्रेनसाठी या सिस्टिमला 1500 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च होणार होते.
पहिला धक्का रेल्वेनेच दिला
चीनसोबत तणाव वाढल्यानंतर भारतीय रेल्वेने कानपूर कॉरिडॉरचा सिग्नलिंग आणि टेलिकम्युनिकेशनचा 471 कोटी रुपयांचा ठेका रद्द करण्यात आला होता. तेव्हा देशात चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी वाढली होती.
अन्य महत्वाच्या बातम्या...
Railway Recruitment : रेल्वे भरती! जागा वाढल्या, संधी साधावी; विना परिक्षा होणार निवड
युवा नेत्याची मोठी तयारी! सीबीआयसमोर स्वत: जाणार; भाजपाचा आरोप
किम जोंग उन संकटात; बहिणीला बनविले उत्तराधिकारी? दिली मोठी जबाबदारी
भारतीयांची घोर फसवणूक! Made in PRC लिहून चिनी उत्पादने विकताहेत 'स्वदेशी' कंपन्या
'पती खूप प्रेम करतो, श्वास कोंडतोय!', नवविवाहितेला हवाय तलाक; कारणे वाचून व्हाल अवाक्
कुटील पाकिस्तान! चीनी युद्धनौकांच्या सर्वात मोठ्या तळावर पाठविला दूत; भारताविरोधात तीन प्रस्ताव