वंदे भारत एक्सप्रेसला तिसऱ्यांदा अपघात! गायीने दिली धडक, ट्रेनचा पुढचा भाग तुटला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2022 12:10 PM2022-10-29T12:10:13+5:302022-10-29T12:12:32+5:30

देशातील सर्वात वेगवान ट्रेन वंदे भारत एक्सप्रेसचा गुजरातमध्ये पुन्हा अपघात झाला आहे. वलसाडमधील अतुल रेल्वे स्थानकावर हा अपघात झाला.

Vande Bharat Express accident for the third time cow hit the front part of the train broke | वंदे भारत एक्सप्रेसला तिसऱ्यांदा अपघात! गायीने दिली धडक, ट्रेनचा पुढचा भाग तुटला

वंदे भारत एक्सप्रेसला तिसऱ्यांदा अपघात! गायीने दिली धडक, ट्रेनचा पुढचा भाग तुटला

googlenewsNext

देशातील सर्वात वेगवान ट्रेन वंदे भारत एक्सप्रेसचागुजरातमध्ये पुन्हा अपघात झाला आहे. वलसाडमधील अतुल रेल्वे स्थानकावर हा अपघात झाला. गायच्या धडकेमुळे वंदे भारत एक्स्प्रेसच्या पुढील भागाचे नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वंदे भारत एक्सप्रेस वलसाडमधील अतुल रेल्वे स्थानकावरून जात असताना अचानक एक गाय हायस्पीड ट्रेनसमोर आली. गायीला ट्रेनची धडक बसली. गायीच्या धडकेने गाडीच्या पुढील भागाचे नुकसान झाले. ही घटना सकाळी ८.१७ च्या सुमारास घडली.

Vande Bharat Express Accident: मुंबईहून गुजरातला जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला अपघात, मोठी दुर्घटना टळली

या घटनेनंतर अतुल रेल्वे स्टेशनवर सुमारे २६ मिनिटे ट्रेन उभी होती. अतुल रेल्वे स्थानकावरून ८.४३ वाजता गाडी रवाना झाली.

याअगोदरही या ट्रेनचा दोनवेळा अपघात झाला होता. पहिला अपघात मुंबईजवळ झाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच ३० सप्टेंबर रोजी या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला होता. तेव्हा ही गाडी अहमदाबाद येथून दुपारी २ वाजता निघाली होती. ही ट्रेन संध्याकाळी साडेसात वाजता मुंबई सेंट्रल येथे पोहोचली होती. नव्या वंदे भारत एक्स्प्रेसने अहमदाबाद ते मुंबई हे ४९२ किमी अंतर साडे पाच तासांत पूर्ण केले होते.  

रेल्वे पटरी शेजारी असणाऱ्या गावातील लोकांना जनावरांना पटरीवर सोडू न देण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पश्चिम रेल्वे गांधीनगर-अहमदाबाद सेक्शनवर ट्रेनचा वेग ताशी १६० किमीपर्यंत वाढवण्याचे आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कुंपण घालण्याचे काम करणार असल्याची माहिती, ठाकूर यांनी दिली होती.

Web Title: Vande Bharat Express accident for the third time cow hit the front part of the train broke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.