वैष्णोदेवीला जाणाऱ्या प्रवाशांचे 4 तास वाचवणार वंदे भारत एक्स्प्रेस, अमित शाहांचा हिरवा कंदील
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2019 12:17 PM2019-10-03T12:17:53+5:302019-10-03T12:19:16+5:30
वैष्णोदेवी कटरा येथे जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनचा आज शुभारंभ झाला आहे.
नवी दिल्लीः वैष्णोदेवी कटरा येथे जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनचा आज शुभारंभ झाला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा कंदील दाखवला. अमित शाह यांच्याबरोबर रेल्वेमंत्री पीयूष गोयल आणि इतर मंत्रीही इथे उपस्थित होते. पण वंदे भारत एक्स्प्रेसची नियमित सेवा 5 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. या ट्रेननं प्रवास केल्यास प्रवाशांचा चार तासांचा वेळ वाचणार आहे. यासाठी आतापासूनच बुकिंगला सुरुवात झाली आहे.
वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा कंदील दाखवल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, पीयूष गोयल यांच्या नेतृत्त्वात काम सर्व रेल्वे विभागातील कर्मचाऱ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. कारण जम्मू-काश्मीरमधल्या नवरात्रीच्या पवित्र पर्वात रेल्वेनं प्रवाशांना मोठं गिफ्ट दिलं आहे. 2014मध्ये मोदी पंतप्रधान बनले, तेव्हापासून सर्वच प्रवाशांना रेल्वे चांगली आणि सुस्थितीत गंतव्य स्थानापर्यंत पोहोचवते आहे. रेल्वे प्रवाशांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारनं आतापर्यंत महत्त्वाची पावलं उचलली आहे.
आज हायस्पीड वंदे भारत एक्स्प्रेस माता वैष्णोदेवीच्या दरबारात जाणार आहे. 17 फेब्रुवारीपासून वंदे भारत एक्स्प्रेस दिल्लीपासून वाराणसीपर्यंत सुरू होणार आहे. मोदींनी रेल्वेचं हायस्पीड ट्रेनचं जाळं विस्तारण्याचाही एक प्रस्ताव दिला आहे. 130 किमी प्रति तास वेगाने धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसमुळे दिल्ली ते कटरा हे अंतर केवळ 8 तासांचे होणार आहे.Delhi: Union Home Minister Amit Shah and Union Railway Minister Piyush Goyal along with Union Ministers Dr Jitendra Singh and Dr Harsh Vardhan flag-off the Vande Bharat Express from New Delhi to Shri Mata Vaishno Devi Katra. pic.twitter.com/IfODd6Jljr
— ANI (@ANI) October 3, 2019
सध्याच्या स्थितीत हे अंतर कापण्यासाठी 12 तासांचा कालावधी लागतो. तसेच वंदे भारत एक्स्प्रेसच्या फेऱ्या यात्रेकरूंच्या मागणीनुसार वाढविण्यात येतील, असेही सूत्रांनी सांगितले. दरम्यान, वंदे भारत एक्स्प्रेस सुरुवातीला आठवड्याला सोमवार, गुरुवार आणि शनिवारी धावणार आहे. त्यानंतर यात्रेकरूंची मागणी लक्षात घेऊन आठवड्यातील पाच दिवस सुरू करण्यात येईल. वंदे भारत एक्सप्रेस दिल्ली ते कटरा स्थानकापर्यंत तीन महत्त्वाच्या स्थानकांवर थांबेल. दिल्ली नंतर अंबाला जंक्शन, लुधियाना, जम्मू नंतर कटरा पोहोचणार आहे.Union Home Min Amit Shah at the flag-off ceremony of Vande Bharat Express from Delhi to Katra: I'm proud that this 'Made in India' train is being flagged-off from here today. The railways is working towards achieving its targets keeping in mind principles of speed,scale&service pic.twitter.com/eN5AFcabka
— ANI (@ANI) October 3, 2019
दे भारत एक्स्प्रेस ची वैशिष्ट्ये....
- 'मेक इन इंडिया' योजनेचा हिस्सा असलेली भारतातली ही पहिली इंजिनलेस रेल्वे आहे.
- चाचणीदरम्यान या रेल्वेनं ताशी १८० किलोमीटरचा वेग पार केला असून, ती ताशी दोनशे किलोमीटर या वेगानं पळू शकते.
- कितीही वेगानं धावली तरी प्रवाशानं भरून ठेवलेली पाण्याची बाटलीही कलंडणार नाही, इतकी या रेल्वेची स्थिरता असेल, असा दावा करण्यात आलाय.
- १६ डबे असलेली ही रेल्वे पूर्णत: वातानुकूलित आहे.
- या रेल्वेची रचना अशा पद्धतीनं करण्यात आली आहे, की प्रवाशांना थेट ड्रायव्हरची केबिनही दिसू शकेल.
- या रेल्वेला स्वयंचलित दरवाजे आणि स्लायडिंग फूटस्टेप्स असतील. प्रवाशांना वेगवान मोफत वायफाय आणि इन्फोटेनमेंट मिळेल.
- रेल्वेत झिरो डिस्सार्ज बायो व्हॅक्युम शौचालये.
- रेल्वेत एलइडी लाइट्स, मॉड्युलर टॉयलेट्स आणि 'अॅस्थेटिक टच फ्री बाथरूम्स' असतील, शिवाय अपंगांसाठीही मैत्रीपूर्ण सुविधा असेल.
- रेल्वेच्या दोन्ही टोकांना ड्रायव्हर केबिन्स असतील.
- जीपीएस प्रणालीद्वारे प्रत्येक प्रवाशाची माहिती रेल्वेला मिळू शकेल.
- प्रत्येक डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे असतील.
- सर्व डबे एकमेकांशी संलग्न असतील.
- ऊर्जाबचतीसाठी रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टीमची व्यवस्था करण्यात आली आहे.
- आणीबाणीच्या प्रसंगी चालक दलाशी थेट संपर्काची यंत्रणा रेल्वेत असेल.
- रेल्वेत १६ चेअरकार डबे असतील. त्यातील १४ डबे 'नॉन एक्झिक्युटिव्ह' तर दोन डबे 'एक्झिक्युटिव्ह' असतील. प्रत्येक डब्यातील प्रवाशांची संख्या अनुक्रमे ७८ आणि ५६ असेल.
- 'एक्झिक्युटिव्ह' क्लासमधील आसनव्यवस्था फिरती असेल आणि रेल्वे ज्या दिशेनं जातेय, त्या दिशेनं आपलं आसन फिरवता येऊ शकेल.
(वंदे भारत एक्स्प्रेसचा वेगळाच असेल थाट! ही वैशिष्ट्ये आहेत खास)