वंदे भारता ट्रेनबाबत आनंदाची बातमी! प्रवाशांना लवकरच मिळणार ही मोठी सुविधा, प्रवास होणार सुखाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2022 06:25 PM2022-12-01T18:25:06+5:302022-12-01T18:25:56+5:30

देशात आतापर्यंत वंदे भारत एक्सप्रेसच्या चार रेल्वे सुरू करण्यात आल्या आहेत. सध्या वंदे भारत गाड्या देशभरात 4 मार्गांवर धावत आहेत.

vande bharat express train soon have sleeper class ministry rolls out tender | वंदे भारता ट्रेनबाबत आनंदाची बातमी! प्रवाशांना लवकरच मिळणार ही मोठी सुविधा, प्रवास होणार सुखाचा

वंदे भारता ट्रेनबाबत आनंदाची बातमी! प्रवाशांना लवकरच मिळणार ही मोठी सुविधा, प्रवास होणार सुखाचा

Next

देशात आतापर्यंत वंदे भारत एक्सप्रेसच्या चार रेल्वे सुरू करण्यात आल्या आहेत. सध्या वंदे भारत गाड्या देशभरात 4 मार्गांवर धावत आहेत. आगामी काळात या ट्रेनच्या कार्याची व्याप्ती वाढवण्याच्या योजनेवर काम सुरू आहे. या संदर्भात केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माहिती दिली.  सरकार 2025 पर्यंत देशात 475 वंदे भारत एक्सप्रेस गाड्या सुरू करण्याचा विचार करत आहे. यासोबतच रेल्वे मंत्रालयाने नव्या पिढीतील वंदे भारत ट्रेनसाठी 200 नवीन रेक बनवण्यासाठी निविदा जारी करण्यात आली असल्याची माहिती रेल्वे मंत्र्यांनी दिली आहे.

एकूण निविदा खर्च सुमारे 26,000 कोटी रुपये आहे. हा प्रकल्प अवघ्या 30 महिन्यांत पूर्ण करावा लागणार असल्याचेही बोलले जात आहे.

मुंबईतून मरीन ड्राइव्ह होणार गायब...! आपली 'ही' शहरं गिळण्यासाठी सरसावतोय समुद्र

BHEL, BML, Medha, RVNL आणि Alstom India या पाच मोठ्या कंपन्यांनी या प्रकल्पात रस दाखवला आहे. वंदे भारतचे हे 200 रेक फक्त स्लीपर क्लाससाठी डिझाइन केले जातील. ट्रेन अॅल्युमिनियम बॉडीसह बनविली जाऊ शकते. 

या गाड्यांमध्ये वाय-फाय सुविधा असलेले फक्त स्लीपर क्लासचे डबे असतील. प्रत्येक डब्यात प्रवाशांची माहिती आणि इन्फोटेनमेंट देणारे एलईडी स्क्रीन असतील. नवीन डिझाइन केलेल्या वंदे भारत एक्स्प्रेस गाड्यांमध्ये फोटो-उत्प्रेरक अल्ट्राव्हायोलेट वायु शुद्धीकरण प्रणाली असेल, जी हवा शुद्धीकरणासाठी देखील बसविली जाईल.

प्रवास अधिक सुरक्षित आणि आरामदायी करण्यासाठी या गाड्यांमध्ये स्वयंचलित फायर सेन्सर्स, सीसीटीव्ही कॅमेरे आणि जीपीएस प्रणाली देखील असतील. वंदे भारत एक्सप्रेस गाड्या विमानासारखा प्रवास अनुभव देतात. सर्व ट्रेन्स अत्याधुनिक सुरक्षा वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहेत. 

Web Title: vande bharat express train soon have sleeper class ministry rolls out tender

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.