वंदे भारत एक्स्प्रेस बेळगावपर्यंत धावणार, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2022 12:50 PM2022-12-29T12:50:33+5:302022-12-29T13:07:24+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बहुदा येत्या 30 डिसेंबर रोजी हावरा ते न्यू जलपाईगुरी दरम्यान धावणाऱ्या देशातील 7 व्या वंदे भारत एक्स्प्रेस रेल्वेचा शुभारंभ करणार

Vande Bharat Express will run up to Belgaum, Karnataka Chief Minister informed | वंदे भारत एक्स्प्रेस बेळगावपर्यंत धावणार, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

संग्रहीत फोटो

Next

बेळगाव : वंदे भारत एक्सप्रेस ही मध्यम अति वेगवान आधुनिक एक्स्प्रेस रेल्वे लवकरच बेंगलोर ते हुबळी आणि बेळगाव दरम्यान धावेल, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी स्पष्ट केले.

बेळगावच्या नूतन मध्यवर्ती बस स्थानकाचे उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. सर्व काही योजनेनुसार सुरळीत झाल्यास ही प्रतिष्ठेची व आधुनिक रेल्वे सुरू करण्यात येणार असून जेणेकरून तिला या प्रदेशातील पहिली आंतरराज्य वंदे भारत रेल्वे सेवा बनवले जाईल, असेही मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बहुदा येत्या 30 डिसेंबर रोजी हावरा ते न्यू जलपाईगुरी दरम्यान धावणाऱ्या देशातील 7 व्या वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेचा शुभारंभ करणार आहेत.

सध्या देशात सुरू असलेल्या वंदे भारत रेल्वे सेवा पुढीलप्रमाणे आहेत. वाराणसी -नवी दिल्ली वंदे भारत एक्स्प्रेस, कत्रा -नवी दिल्ली वंदे भारत एक्स्प्रेस, मुंबई सेंट्रल -गांधीनगर वंदे भारत एक्स्प्रेस, नवी दिल्ली -एम्ब अंडुरा वंदे भारत एक्स्प्रेस, चेन्नई -म्हैसूर वंदे भारत एक्स्प्रेस आणि बैलसपुर -नाग वंदे भारत एक्स्प्रेस. आता बेंगलोर ते बेळगाव अशी आधुनिक वंदे भारत एक्स्प्रेस सेवा सुरू करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेचे सर्वत्र स्वागत होत आहे.

Web Title: Vande Bharat Express will run up to Belgaum, Karnataka Chief Minister informed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.