Vande Bharat Train Accident:अजब कायदा; 'वंदे भारत ट्रेन'ला म्हशी धडकल्या, रेल्वेने मालकांविरोधात दाखल केला गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2022 02:40 PM2022-10-07T14:40:26+5:302022-10-07T14:44:38+5:30

Vande Bharat Train Accident:गुरुवारी मुंबईवरुन अहमदाबादला जणाऱ्या वंदे भारत ट्रेनला म्हशी धडकल्यामुळे मोठा अपघात झाल्याची घटना.

Vande Bharat Train Accident: 'Vande Bharat Train' was hit by buffaloes, Railway filed a case against the owners | Vande Bharat Train Accident:अजब कायदा; 'वंदे भारत ट्रेन'ला म्हशी धडकल्या, रेल्वेने मालकांविरोधात दाखल केला गुन्हा

Vande Bharat Train Accident:अजब कायदा; 'वंदे भारत ट्रेन'ला म्हशी धडकल्या, रेल्वेने मालकांविरोधात दाखल केला गुन्हा

googlenewsNext

Vande Bharat Train Accident: 30 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारतातील तिसऱ्या 'वंदे भारत ट्रेन'ला हिरवा झेंडा दाखवण्यात आला होता. त्याच्या काही दिवसानंतर म्हणजेच, गुरुवारी(दि.6) मुंबईहून अहमदाबादकडे जाणाऱ्या या हायस्पीड वंदे भारत ट्रेन (Vande Bharat Train)चा अपघात झाला. रेल्वे रुळावरून घसरली नाही, तर काही म्हशी ट्रेनला धडकल्या. वाटवा आणि मणिनगर स्थानकांजवळ हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, रेल्वेचा पुढील भाग तुटला. तसेच, या अपघातात 4 म्हशींचा मृत्यूही झाला. 

म्हशींच्या मालकांविरोधात गुन्हा
या अपघातानंतर रेल्वे विभागाने एक अजब काम केले आहे. म्हशींच्या मृत्यूमुळे मोठे नुकसान झालेल्या मालकांविरोधात रेल्वे संरक्षण दलाने (RPF) गुन्हा दाखल केला आहे. वाटवा रेल्वे स्टेशनवर तैनात आरपीएफ निरीक्षक प्रदीप शर्मा यांनी सांगितले की, म्हशींच्या मालकांविरोधात रेल्वे कायदा, 1989 च्या कलम 147 अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. रेल्वेच्या कोणत्याही भागात अनधिकृतपणे प्रवेश करणे आणि त्याच्या मालमत्तेच्या गैरवापराशी संबंधित हा कायदा आहे. अद्याप म्हशींच्या मालकांची ओळख पटलेली नाही.

ट्रेन 20 मिनिटे थांबवावी लागली
अहमदाबाद रेल्वेच्या पीआरओने सांगितले की, सकाळी 11.15 च्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर ट्रेन 20 मिनिटे थांबवावी लागली. त्यानंतर गाडी रवाना करण्यात आली. रेल्वेचे सीपीआरओ सुमित ठाकूर म्हणाले की, गावकऱ्यांना त्यांची गुरे ट्रॅकजवळ न सोडण्याचा सल्ला देण्यात येत आहे. पश्चिम रेल्वे गांधीनगर-अहमदाबाद सेक्शनवर ट्रेनचा वेग ताशी 160 किमीपर्यंत वाढविण्याचे आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कुंपण घालण्याचे काम करेल.

भारतातील तिसरी वंदे भारत ट्रेन
देशातील ही तिसरी वंदे भारत ट्रेन आहे. यापूर्वी वंदे भारत ट्रेन नवी दिल्ली ते वाराणसी आणि नवी दिल्ली-माता वैष्णो देवी कटरा दरम्यान धावत आहेत. ही गाडी गांधीनगरहून अहमदाबादमार्गे मुंबईला जाते आणि नंतर या मार्गाने पुन्हा गांधीनगरला येते. विशेष म्हणजे या 'वंदे भारत ट्रेन'ला 30 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हिरवा झेंडा दाखवला होता. त्यांनी गांधीनगर ते अहमदाबाद असा प्रवासही केला. ही ट्रेन 180 ते 200 किमी/ताशी वेगाने धावू शकते.

आणखी 400 वंदे भारत ट्रेन चालवण्याची तयारी
रेल्वे बोर्ड देशभरात 400 सेमी हायस्पीड वंदे भारत ट्रेन चालवण्याच्या तयारीत आहे. केंद्र सरकारने मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरी येथे वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांचे सुमारे 1600 डबे तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रत्येक डब्याची किंमत 8 कोटी ते 9 कोटी रुपये असेल. त्यामुळे कारखान्यात आवश्यक बदल सुरू झाले आहेत. वंदे भारत ट्रेन अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे. यामध्ये जीपीएस आधारित माहिती प्रणाली, सीसीटीव्ही कॅमेरे, व्हॅक्यूम आधारित बायो टॉयलेट, स्वयंचलित दरवाजे आणि प्रत्येक कोचमध्ये चार आपत्कालीन पुश बटणे यांचा समावेश आहे.
 

Web Title: Vande Bharat Train Accident: 'Vande Bharat Train' was hit by buffaloes, Railway filed a case against the owners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.