पश्चिम बंगालमध्ये वंदे भारत ट्रेनवर पुन्हा दगडफेक; आठवड्यात तिसरी घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2023 10:18 PM2023-01-08T22:18:09+5:302023-01-08T22:38:01+5:30

काही दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमध्ये वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला होता, तर दुसरीकडे वंदे बारत ट्रेनवर दगडफेकीच्या घटना समोर आल्या आहेत.

vande bharat train stone pelting in west bengal railway station | पश्चिम बंगालमध्ये वंदे भारत ट्रेनवर पुन्हा दगडफेक; आठवड्यात तिसरी घटना

पश्चिम बंगालमध्ये वंदे भारत ट्रेनवर पुन्हा दगडफेक; आठवड्यात तिसरी घटना

Next

काही दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमध्ये वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला होता, तर दुसरीकडे वंदे भारत ट्रेनवर दगडफेक झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. पश्चिम बंगालमधील बारोसाई रेल्वे स्थानकाजवळ रविवारी वंदे भारत ट्रेनवर दगडफेक करण्यात आली.

त्यामुळे खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. वंदे भारत ट्रेन हावडाहून न्यू जलपाईगुडीला येत होती. या हल्ल्यानंतर एकाच आठवड्यात वंदे भारत ट्रेनवर दगडफेकीच्या तीन घटना समोर आल्या आहेत.

घटना जशी हाताळावी तशी ...; टाटा समुहाच्या अध्यक्षांचे लघुशंका प्रकरणावर स्पष्टीकरण

याअगोदर 2 जानेवारीला मालदाजवळ वंदे भारत ट्रेनवर आणि 3 जानेवारीला फणसीदेवाजवळ दगडफेक करण्यात आली होती.

3 जानेवारी रोजी झालेल्या दगडफेकीच्या प्रकरणात पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले होते. 3  जानेवारी रोजी किशनगंज येथे हावडा ते न्यू जलपाईगुडी वंदे भारत ट्रेनवर दगडफेक झाली होती. 30 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हावडा NJP वंदे भर ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला.

किशनगंजचे एसपी डॉ. इनामुल हक यांनी गुरुवारी या प्रकरणी एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. यात रेल्वे अधिकाऱ्यांनी दगडफेकीची माहिती दिली.

या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला. तपासादरम्यान, सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता चार मुलांनी वंदे भारत ट्रेनवर दगडफेक केल्याचे आढळून आले. यानंतर पोलिसांनी चारपैकी तीन अल्पवयीन मुलांना पोथिया पोलिस ठाण्याच्या हद्दीतून ताब्यात घेऊन त्यांना बाल न्याय परिषदेसमोर हजर करण्यासाठी पाठवले. 

Web Title: vande bharat train stone pelting in west bengal railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.