वंदेमातरम् स्पर्धेमुळे देशभक्तीचा भाव जागृत होईल
By admin | Published: August 10, 2015 11:28 PM2015-08-10T23:28:22+5:302015-08-10T23:28:22+5:30
प्रवीण दटके : पहिल्या फेरीत तीन शाळांची निवड
Next
प रवीण दटके : पहिल्या फेरीत तीन शाळांची निवड नागपूर : वंदेमातरम् हा स्वातंत्र्य लढ्याचा मूलमंत्र असून त्याच्या सामूहिक गायनाने विद्यार्थ्यांच्या मनात देशभक्तीचा भाव जागृत होईल, असे प्रतिपादन महापौर प्रवीण दटके यांनी सोमवारी केले. मनपाच्या शिक्षण विभागातर्फे शिक्षक संघाच्या अध्यापक भवन येथे आयोजित महापौर चषक वंदेमातरम् समूहगान स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी, शिक्षण समितीचे सभापती गोपाल बोहरे, क्रीडा समितीचे सभापती हरीश दिकांेडवार, शिक्षणाधिकारी अशोक टालाटुले, स्पर्धेचे परीक्षक मोरेश्वर निस्ताने, पुरुषोत्तम ताईसकर व अनिता तोटेवार आदी उपस्थित होते. मनपाच्या शिक्षण विभागामार्फत १९९५ सालापासून ही स्पर्धा आयोजित करण्यात येत असल्याची माहिती अशोक टालाटुले यांनी प्रास्ताविकातून दिली. ही स्पर्धा तीन गटात विभागली असून पहिल्या गटात वर्ग ९ व १० च्या विद्यार्थ्यांची पहिली फेरी पार पडली. यात २७ शाळांनी सहभाग घेतला. त्यातून विमलताई तिडके विद्यालय, आर.एस. मुंडले, साऊ थ पॉईंट व मनपाची दुर्गानगर येथील माध्यमिक शाळा आदींची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली. या शाळेतील स्पर्धकांनी प्रत्येकी एक देशभक्तीपर गीत सादर केले. ११ ऑगस्टला दुसऱ्या गटातील वर्ग ६ ते ८, १२ तारखेला तिसऱ्या गटातील वर्ग १ ते ५ विद्यार्थ्यांची पहिली फेरी होणार आहे. स्पर्धेची अंतिम फेरी १४ ऑगस्टला होणार असून समारोप १४ ऑगस्टला दुपारी १ वाजता आयएमए हॉल येेथे केला जाईल. यावेळी विजेत्यांना बक्षीस व प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव केला जाणार आहे. कार्यक्रमाला शिक्षण विभागाचे रवी खंडाईत, देवीदास बतकी, जितेंद्र गायकवाड, राहुल गायकी, संजय भुरे आदी उपस्थित होते. संचालन अरुणा गावंडे यांनी तर आभार विजय इमाने यांनी मानले.(प्रतिनिधी)