सामान्यांसाठी आली ‘वंदे साधारण’; मुंबईत शनिवारी रात्री झाली दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2023 06:49 AM2023-10-30T06:49:53+5:302023-10-30T06:50:13+5:30

‘वंदे भारत’ला प्रवाशांची पसंती, मात्र प्रवास खर्चिक

Vande Sadharan Express Train for For common man came to Mumbai on this Saturday night | सामान्यांसाठी आली ‘वंदे साधारण’; मुंबईत शनिवारी रात्री झाली दाखल

सामान्यांसाठी आली ‘वंदे साधारण’; मुंबईत शनिवारी रात्री झाली दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: देशातील सेमी हायस्पीड ट्रेन ‘वंदे भारत’ला प्रवाशांची पसंती मिळत आहे. मात्र हा प्रवास खर्चिक होता; परंतु सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल अशी वंदे साधारण ट्रेन तयार केली आहे. ही  गाडी चेन्नईच्या आयसीएफ फॅक्टरीतून चाचणीसाठी बाहेर पडली असून, ती मुंबईत मध्य रेल्वेच्या वाडीबंदर यार्डात शनिवारी रात्री दाखल झाली. आवश्यक  त्या तपासण्या केल्यानंतर मुंबई-पुणे आणि कसारा-इगतपुरी या घाटमार्गावर तिच्या चाचण्या घेतल्या जाणार आहेत.

अशी आहे गाडी

 गाडीला २२ डबे असून १८०० प्रवाशांना  आरामदायी प्रवास करता येईल. या  गाडीचा ताशी वेग १३० किलोमीटर असा असणार आहे.
 वेगवान प्रवासासाठी गाडीला पुश-पुलसाठी मागे आणि पुढे इंजिन
 दोन्ही इंजिन कायमस्वरूपी गाडीलाच जोडलेली असणार
 प्रत्येक डब्याची अंतर्गत रचना आकर्षक, नव्या मॉडेलची एलइडी लाईट्स, फॅन, स्विच - प्रत्येक सीटजवळ मोबाइल चार्जिंग पॉईंट
 डब्यात सामान्य प्रवाशांबरोबरच दिव्यांगांसाठी स्वतंत्र शौचालय
 डबे कायमस्वरूपी कपलिंगच्या माध्यमातून जोडले असल्याने प्रवासादरम्यान धक्के जाणवणार नाहीत.

Web Title: Vande Sadharan Express Train for For common man came to Mumbai on this Saturday night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.