काशीवर आई अन्नपूर्णा अन् बाबा विश्वनाथांचा आशीर्वाद, भारताचे प्रमुख निर्यात केंद्र बनवणार- मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2020 01:44 PM2020-07-09T13:44:21+5:302020-07-09T14:09:47+5:30
मंदिर, दुर्गाकुंड, संकटमोचन येथे श्रावणातील जत्राही भरली जाणार नाही, हेही सत्य आहे.
नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी आपल्या लोकसभा मतदारसंघ वाराणसी येथील कामगारांशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वात पहिल्यांदा हर हर हर महादेव !ची घोषणा दिली. पुढे ते म्हणाले, तुम्ही काशीच्या धरतीवरचे सर्व पुण्यवान लोक आहात. तसेच त्यांनी विविध सेवाभावी संस्थांशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भगवान शंकर यांचे हेआशीर्वाद आहेत की, कोरोनाच्या या संकटातही आमची काशी आशा आणि उत्साहाने परिपूर्ण आहे. कोरोनामुळे लोक काशी विश्वनाथ मंदिरात जाऊ शकत नाहीत. मंदिर, दुर्गाकुंड, संकटमोचन येथे श्रावणातील जत्राही भरली जाणार नाही, हेही सत्य आहे. पण या अभूतपूर्व संकटाच्या वेळी आपल्या काशीने जोरदार लढा दिला आहे.
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मोदींनी संवाद साधला आहे. वाराणसीच्या गायत्री परिवार क्रिएटिव्ह ट्रस्टचे गंगाधर उपाध्याय, एचडीएफसी बँक वाराणसीचे सर्कल हेड मनीष टंडन, राष्ट्रीय रोटी बँकेचे अध्यक्ष पूनम सिंह आणि केंद्रीय सिंधी पंचायतचे माजी सरचिटणीस सुरेंद्र लालवाणी आणि विणकर व सामाजिक कार्यकर्ते हाजी अनवर हेसुद्धा यात सहभागी झाले होते. मोदींनी आपला अनुभवही उपस्थितांना सांगितला आहे. या व्यतिरिक्त त्यांनी अखिल भारतीय केशरवाणी वैश्य युवा सभेचे प्रतिनिधी संदीप केसरी यांच्याशी संवाद साधला आणि लॉकडाऊनदरम्यान झालेल्या कामांचे कौतुक केले. पंतप्रधान म्हणाले की, सेवा करणारे सेवेच्या फळाचा विचार करत नाहीत.
ते लोक नि: स्वार्थपणे इतरांची सेवा करत राहतात. एक जुनी श्रद्धा आहे की एकेकाळी महादेवाने स्वत: आई अन्नपूर्णाकडे भीक मागितली होती, तेव्हापासून काशीवर हा विशेष आशीर्वाद आहे की, येथे कोणी भुकेला झोपणार नाही. आई अन्नपूर्णा आणि बाबा विश्वनाथ सर्वांच्या जेवणाची व्यवस्था करतील, असंही मोदींनी म्हटलं आहे. भगवंताने आम्हाला गरिबांसाठी सेवा करण्याचे माध्यम बनविले आहे. एक प्रकारे तुम्ही सर्वजण आई अन्नपूर्णा आणि बाबा विश्वनाथ यांचे संदेशवाहक बनून प्रत्येक गरजूपर्यंत पोहोचले पाहिजे. अल्पावधीतच फूड हेल्पलाईन आणि कम्युनिटी किचनचे विस्तृत नेटवर्क तयार करणे, हेल्पलाईन विकसित करणे, डेटा सायन्सची मदत घेणे, वाराणसी स्मार्ट सिटीच्या नियंत्रण व कमांड सेंटरचा पूर्ण उपयोग करणे आवश्यक आहे. म्हणजेच प्रत्येक जणास प्रत्येक स्तरावर गरिबांना मदत करण्याची पूर्ण क्षमता असल्याचंही ते म्हणाले आहेत.
हेही वाचा
Whatsapp, Facebook, Instagram एकत्र येणार?; लवकरच घोषणा होण्याची शक्यता
मोठी बातमी; आता कागदपत्रांशिवाय PFमधून पैसे काढता येणार; नोकरदारांचं टेन्शनच संपणार
VIDEO : ...अन् तो पोलिसांसमोर ओरडला, "मैं ही हूँ विकास दुबे कानपूर वाला"
नियम बदलले! फक्त ७ रुपये गुंतवून मिळवा ६० हजारांची पेन्शन; २.२८ कोटी लोकांना फायदा
मोठी बातमी! आठ पोलिसांचं हत्याकांड घडवणाऱ्या गँगस्टर विकास दुबेला अटक
रेल्वेचं खासगीकरण होणार नाही, पीयूष गोयल यांची मोठी घोषणा
तैवान, जपाननंतर आता व्हिएतनामला चिथावतोय चीन; वादग्रस्त भागात पाठवल्या युद्धनौका