नव्या बॉयफ्रेंन्डसाठी जुन्या प्रियकराची हत्या; चालत्या बाईकवरुन तरुणावर झाडली गोळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 14:32 IST2025-03-20T14:30:01+5:302025-03-20T14:32:22+5:30
वाराणसीमध्ये एका तरुणीने नवीन प्रियकरासाठी पूर्वीच्या प्रियकराची हत्या घडवून आणली.

नव्या बॉयफ्रेंन्डसाठी जुन्या प्रियकराची हत्या; चालत्या बाईकवरुन तरुणावर झाडली गोळी
Varanasi Crime: उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये एका महिलेने प्रियकरासाठी पतीची निर्घृणपणे हत्या केल्याचा प्रकरण देशभरात गाजत आहेत. पतीच्या मृतदेहाचे तुकडे करुन ड्रममध्ये भरल्याचा प्रकार समोर आल्यानंतर उत्तर प्रदेशात खळबळ उडाली. त्यानंतर आता वाराणसीमधूनही हादरवणारी घटना घडली आहे. एका मुलीने तिच्या जुन्या प्रियकराची तिच्या नवीन प्रियकराकडून हत्या घडवून आणली आहे. होळीच्या रात्री हा सगळा प्रकार घडला. आता पोलिसांनी या खुनाचा खुलासा करत आरोपीला अटक केली आहे.
वाराणसीच्या औसनगंजमध्ये दिलजीत उर्फ रंगोली नावाच्या तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हत्येनंतर आरोपी फरार झाले होते. या घटनेनंतर बराच तणाव निर्माण झाला आणि त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. हा सगळा प्रकार घडला तेव्हा दिलजीत त्याच्या घराबाहेर प्रेयसीसोबत फोनवर बोलत होता. त्याचवेळी अचानक हेल्मेट घातलेला एक तरुण बाईकवरुन दिलजीतजवळ आला. त्याने फिल्मी स्टाईलमध्ये चालत्या बाईकवरून दिलजीतच्या छातीत गोळी झाडली आणि तेथून पळ काढला. आजूबाजूच्या लोकांनी दिलजीतला तात्काळ जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेले मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
मृत दिलजीतचे काही महिन्यांपूर्वीच साखरपुडा झाला होता. मात्र तो त्याच्या जुन्या प्रेयसीला सोडू शकला नाही. मात्र त्या तरुणीला दिलजीतपासून सुटका हवी होती. त्यामुळे तरुणीने मुघलसराय येथील नवीन प्रियकर राजकुमार याची मदत घेतली. महत्त्वाची बाब म्हणजे दिलजीतनेच राजकुमारची त्याच्या प्रेयसीसोबत ओळख करून दिली होती आणि तिघेही एकमेकांना चांगले ओळखत होते. राजकुमारमुळेच तरुणीने दिलजीतसोबत संबंध तोडले. मात्र दिलजीत तरुणीला सोडण्यासाठी तयार नव्हता. शेवटी राजकुमार आणि तरुणीने मिळून दिलजीतला बाजूला करण्याचा कट रचला.
व्हिडिओ चॅटच्या माध्यमातून राजकुमारने तरुणीला त्याच्याकडेची बंदूक दाखवली होती. यावरुनच तरुणीने दिलजीतला संपवण्याची योजना होती. तरुणीने आणि राजकुरमाने होळीच्या दिवशी दिलजीतला संपवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तरुणीने दिलजीतल फोनवर बोलता बोलता घराबाहेर बोलवलं. त्यानंतर दिलजीतच्या छातीत गोळी झाडली. या सगळ्या प्रकारानंतर ५० मिनिटांनी आरोपी राजकुमार एका टेम्पोच्या मागे उभ्या असलेल्या दुचाकीवर बॅगसह दिसला. नंतर तो घटनास्थळावरून पळून गेला.
दरम्यान, संशयाच्या आधारे पोलिसांनी प्रेयसीची चौकशी करुन आरोपीला पकडले. जैतपुरा पोलिसांच्या पथकाने सकाळी आरोपीला वाराणसीच्या संपूर्णानंद विद्यापीठाच्या गेटजवळ अटक केली.