वारेमाप वाळू उपशामुळे जलपातळी घटली गिरणाकाठची गावांमधील स्थिती : बंदी नंतरही दिवसरात्र सुरु आहे वाहतूक
By admin | Published: December 6, 2015 11:51 PM2015-12-06T23:51:45+5:302015-12-06T23:51:45+5:30
जळगाव : गिरणा नदीच्या काठावरील गाव परिसरातील वाळूच्या प्रचंड उपशामुळे नदीपात्रातील जलपातळीत घट झाली असताना या गावांना धोका निर्माण झाला आहे. आव्हाणे, खेडी, वडनगरी, फुपनगरी, दापोरा या गावांमध्ये अवैध वाळू उपशावरून नागरिक आक्रमक झाले आहेत.
Next
ज गाव : गिरणा नदीच्या काठावरील गाव परिसरातील वाळूच्या प्रचंड उपशामुळे नदीपात्रातील जलपातळीत घट झाली असताना या गावांना धोका निर्माण झाला आहे. आव्हाणे, खेडी, वडनगरी, फुपनगरी, दापोरा या गावांमध्ये अवैध वाळू उपशावरून नागरिक आक्रमक झाले आहेत.विहिरीची जलपातळी घटलीजिल्हाभरातील २८ ग्रामपंचायतींनी वाळू उपशास नकार दिला आहे. या ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात झालेल्या प्रचंड वाळू उपशामुळे तेथील पाणी पातळीत घट झाली आहे. या भागातील विहिरींचे जलस्त्रोत कमी होण्याचे प्रकार वाढले आहे. त्याचा फटका हा आजूबाजूच्या गावातील सिंचनावर होत आहे. पाण्याअभावी या भागातील पिकांचे नुकसान होऊ लागले आहे.पाणी पुरवठ्यावर झाला परिणामगिरणा नदीच्या काठी अनेक गावांनी पिण्याच्या पाण्यासाठी विहिरी खोदून त्या ठिकाणावरून गावापर्यंत जलवाहिनी टाकल्या आहेत. गिरणा नदी काठावर असलेल्या या विहिरींना बारा महिने पाणी असल्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई फारशी या गावांना भासत नव्हती. मात्र वाळूच्या प्रचंड उपशामुळे नदीपात्रातील विहिरीची जलपातळी घटल्याने त्याचा फटका हा पाणीपुरवठा यंत्रणेवर होत आहे. त्याचा परिणाम म्हणून शिरसोलीसह अनेक गावांमध्ये आजही सात ते आठ दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे.तापी नदी पात्राकडे वळविला मोर्चाजिल्हा प्रशासनाने वाळूच्या ४४ गटांसाठी लिलाव प्रक्रिया सुरु केली आहे. मात्र आजही गिरणा काठच्या आव्हाणे, खेडी, वडनगरी, फुपनगरी, बांभोरी, दापोरा, कुवारखेडे, नागझिरी, धानोरा बुद्रुक गावांमधून मोठ्या प्रमाणात अवैध स्वरुपाचा वाळूचा उपसा सुरु आहे. क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात वाळूचा उपसा झाल्यामुळे बांधकामासाठी आवश्यक असलेली चांगल्या प्रतीच्या वाळूचा साठा हा कमी होत असल्याने वाळू उचल करणार्या धुळे, नाशिक, मालेगाव येथील व्यावसायीकांनी अन्य जिल्ह्यातील तापी नदीकडे आपला मोर्चा वळविला आहे.