वन्यजीव गणणेत विविध प्राण्यांचे दर्शन

By admin | Published: May 23, 2016 12:41 AM2016-05-23T00:41:11+5:302016-05-23T00:41:11+5:30

जळगाव : वन्यजीव संरक्षण संस्थेच्यावतीने वढोदा वनपरीक्षेत्रातील पाणवठ्यांवर बुध्दपौर्णिमेच्या रात्री वन्यप्राणी गणना करण्यात आली. यामध्ये विविध जातींचे प्राणी व पक्षी आढळून आले.

Various animal figures in wildlife calculations | वन्यजीव गणणेत विविध प्राण्यांचे दर्शन

वन्यजीव गणणेत विविध प्राण्यांचे दर्शन

Next
गाव : वन्यजीव संरक्षण संस्थेच्यावतीने वढोदा वनपरीक्षेत्रातील पाणवठ्यांवर बुध्दपौर्णिमेच्या रात्री वन्यप्राणी गणना करण्यात आली. यामध्ये विविध जातींचे प्राणी व पक्षी आढळून आले.
२१ मे रोजी संध्याकाळी ४ वाजेपासून ते २२ मे रोजी सकाळी १० वाजेपयंर्त ही गणणा करण्यात आली. यामध्ये आढलेले वन्यजीव असे...
कोल्हे-४ लांडगे-१० तडस-१ उदमांजर-४ साळींदर-२ निलगाय-२२ चिंकारा-४३ भेकर- २ झाड चुचूंद्री ७ लंगूर माकडे- १४५ रानडुक्कर- ७९ मोर- ६९ चितळ-५९ सांबर- ७
या गणणे मध्ये वासुदेव वाढे, बाळकृष्ण देवरे, रवींद्र्र सोनवणे,राहुल सोनवणे , सतीश कांबळे, योगेश गालफाडे, हेमराज सोनवणे, अझिम काझी, ऋषी राजपूत, चेतन भावसार, प्रसाद सोनवणे, गौरव शिंपी, जयेश पाटिल, बबलू शिंदे, सुनील पाटील, सुरेंद्र नारखेडे हे सदस्य सहभागी झाले होते. प्रगणेसाठी जळगाव वनविभागाचे उपवनसंरक्षक एम. आदर्शरेड्डी आणि सहाय्यक उपवनसंरक्षक डी. आर. पाटील यांच्यासह संपूर्ण स्टाफ सह सहभागी झाला होता.
आकडेवारी....
पाणवठे-१५ वन्यजीव प्रगणक- १५ वनविभाग कर्मचारी- १९ संयुक्त वनव्यवस्थापन समीती सदस्य- १३
दक्षिण डोलारखेडा भागात आदल्या दिवशी प˜ेदार वाघाच्या पायाच्या ठस्याद्वारे (पगमार्क्स) अस्तित्व जाणवले.

Web Title: Various animal figures in wildlife calculations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.