जि.प.कर्मचार्‍यांतर्फे विविध मागण्या

By Admin | Published: April 5, 2016 12:15 AM2016-04-05T00:15:25+5:302016-04-05T00:15:25+5:30

जळगाव- जिल्हा परिषदेच्या विविध कर्मचार्‍यांनी सोमवारी दुपारी जि.प.समोर विविध मागण्यांसाठी निदर्शने केेली. जि.प.कर्मचारी महासंघाच्या नेतृत्वामध्ये ही निदर्शने करण्यात आली. अंशदायी पेंशन योजना रद्द करा, जुनी पेंशन योजना लागू करा, सातव्या वेतन आयोगातील कर्मचारी विरोधी शिफारसी रद्द करा, नोकर भरतीवरील निर्बंध रद्द करा, अनुकंपा तत्वावर पूर्वीप्रमाणे नेमणुका करा, कंत्राटीकरण, नैमित्तिक नियुक्ती करू नये, कर्मचार्‍यांवर होणार्‍या हल्ल्यांबाबत परिणामकारक कायदा करा, शिक्षणातील विना अनुदान धोरण दूर करा, केंद्राप्रमाणे महागाई भत्ता द्यावा, पाच दिवसाचा आठवडा करा, दरमहा १ तारखेला वेतन अदा करावे, जातपडताळणी कार्यालय जिल्‘ाच्या ठिकाणी सुरू करा, आगावू वेतनवाढ पूर्वीप्रमाणे द्या आदी मागण्या करण्यात आल्या. आंदोलनात कर्मचारी महासंघाच्या राज्य उपाध्यक्ष प्रतिभा सुर्वे, जिल्हाध्यक्ष्

Various demands from ZP staff | जि.प.कर्मचार्‍यांतर्फे विविध मागण्या

जि.प.कर्मचार्‍यांतर्फे विविध मागण्या

googlenewsNext
गाव- जिल्हा परिषदेच्या विविध कर्मचार्‍यांनी सोमवारी दुपारी जि.प.समोर विविध मागण्यांसाठी निदर्शने केेली. जि.प.कर्मचारी महासंघाच्या नेतृत्वामध्ये ही निदर्शने करण्यात आली. अंशदायी पेंशन योजना रद्द करा, जुनी पेंशन योजना लागू करा, सातव्या वेतन आयोगातील कर्मचारी विरोधी शिफारसी रद्द करा, नोकर भरतीवरील निर्बंध रद्द करा, अनुकंपा तत्वावर पूर्वीप्रमाणे नेमणुका करा, कंत्राटीकरण, नैमित्तिक नियुक्ती करू नये, कर्मचार्‍यांवर होणार्‍या हल्ल्यांबाबत परिणामकारक कायदा करा, शिक्षणातील विना अनुदान धोरण दूर करा, केंद्राप्रमाणे महागाई भत्ता द्यावा, पाच दिवसाचा आठवडा करा, दरमहा १ तारखेला वेतन अदा करावे, जातपडताळणी कार्यालय जिल्‘ाच्या ठिकाणी सुरू करा, आगावू वेतनवाढ पूर्वीप्रमाणे द्या आदी मागण्या करण्यात आल्या. आंदोलनात कर्मचारी महासंघाच्या राज्य उपाध्यक्ष प्रतिभा सुर्वे, जिल्हाध्यक्ष मंगेश बाविस्कर, रवींद्र मराठे, मनोज अमृतकर, प्रकाश पाटील, मनोज खरारे आदी सहभागी झाले होते.

Web Title: Various demands from ZP staff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.