विविध वृत्त

By admin | Published: August 14, 2015 12:32 AM2015-08-14T00:32:59+5:302015-08-14T00:32:59+5:30

जिल्हा समाजकल्याण कार्यालयातर्फे शिष्यवृत्ती कॅम्प

Various news stories | विविध वृत्त

विविध वृत्त

Next
ल्हा समाजकल्याण कार्यालयातर्फे शिष्यवृत्ती कॅम्प
सोलापूर: सन २0१५-१६ या वर्षाकरिता मागासवर्गीय शिक्षण फी, परीक्षा फी, गुणवत्ता शिष्यवृत्ती तसेच सावित्रीबाई फुले मुलींची शिष्यवृत्ती आदी योजनांसाठी तालुकानिहाय कॅम्पचे आयोजन केले आहे. यात २० ऑगस्टला शहाजी हायस्कूल,अक्कलकोट,२५ ऑगस्ट - न्यू इंग्लिश स्कूल मंगळवेढा, २७ ऑगस्ट डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रशाला, कुर्डूवाडी (माढा), २ सप्टेंबर गोपाळराव देव प्रशाला, माळशिरस, ४ सप्टेंबर सुलाखे हायस्कूल, बार्शी, ८ सप्टेंबर इंदिरा गांधी कन्या प्रशाला, मोहोळ, १० सप्टेंबर महात्मा गांधी हायस्कूल, करमाळा, १५ सप्टेंबर आपटे उपलप प्रशाला, पंढरपूर, २२ सप्टेंबर विद्यामंदिर हायस्कूल, सांगोला, २६ सप्टेंबर महात्मा फुले विद्यालय, मंद्रुप (द. सोलापूर), २९ /३० सप्टेंबर व १ ऑक्टोबर सेवासदन प्रशाला, सोलापूर या ठिकाणी शहर प्राथमिक, माध्यमिक व उत्तर सोलापूर तालुक्यातील लाभार्थी उपस्थित राहतील.
सर्व ठिकाणी होणार्‍या कॅम्पला आवश्यक त्या कागदपत्रांसह संबंधितांनी उपस्थित राहून ऑनलाईन माहिती भरावी, असे आवाहन जि. प. चे जिल्हा समाजकल्याण अधिकारी नागनाथ चौगुले यांनी एका पत्रकान्वये केले आहे.
आरटीओतर्फे रिक्षांना बंदिस्त जाळी बसविण्याचे आवाहन
सोलापूर: बजाज ऑप्टीमा या ऑटोरिक्षा वाहनाची आसन क्षमता तीन अधिक १ एवढी असताना या रिक्षामध्ये मध्यभागी मागील बाजूस ३ किंवा ४ प्रवासी बसू शकतात यामुळे अपघाताची शक्यता असते. त्यामुळे जिल्हाधिकारी व जिल्हा परिवहन प्राधिकरणाने अशा रिक्षांना मागील बाजूस बंदिस्त जाळी बसविण्यात यावी. रिक्षाचालकांनी उपप्रादेशिक परिवहन विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन या कार्यालयाच्या अधिकार्‍यांनी एका पत्रकान्वये केले आहे.
वसंतराव नाईक महामंडळातर्फे आवाहन
सोलापूर: विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागास जातीचा प्रवर्ग असलेल्या १८ ते ५५ वयोगटातील इच्छुकांना वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (मर्या), सोलापूर या कार्यालयाच्या वतीने बीजभांडवल कर्ज योजना तसेच २५ टक्के थेट कर्ज योजना देण्यात येणार आहे. इच्छुकांनी यासाठी जातीचा, उत्पन्नाचा (शहरी/ग्रामीण-रुपये १० हजारांपर्यंतचा) दाखला, रेशन व आधारकार्ड झेरॉक्स, कोटेशन, प्रकल्प अहवाल तसेच वाहनासाठी लायसन्स वाहन परवाना आदी सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Various news stories

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.