बदलते हवामान, रोगातही तग धरणारे गव्हाचे वाण विकसित

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2019 04:50 AM2019-03-04T04:50:46+5:302019-03-04T04:50:54+5:30

भारतीय कृषी संशोधन संस्थेने गव्हाचे नवे वाण विकसित केले आहे.

Various varieties of wheat varieties developed in the changing weather, diseases | बदलते हवामान, रोगातही तग धरणारे गव्हाचे वाण विकसित

बदलते हवामान, रोगातही तग धरणारे गव्हाचे वाण विकसित

Next

- टेकचंद सोनवणे 

नवी दिल्ली : भारतीय कृषी संशोधन संस्थेने गव्हाचे नवे वाण विकसित केले आहे. भारताच्या अन्नधान्य आणि पोषण सुरक्षिततेसाठी वरदान ठरणाऱ्या ‘एचडी ३२२६’ (पुसा यशस्वी) या गव्हाच्या वाणाचा शोध लावला आहे. कोल्हापूरच्या डॉ. किरण बापूसाहेब गायकवाड यांनी. डॉ. गायकवाड भारतीय कृषी संशोधन संस्थेत (आयएआरआय) शास्त्रज्ञ आहेत.
कर्बोदके (कार्बोहायड्रेट) खाल्ल्यानंतर तात्काळ शर्करा तयार होते. मधुमेहग्रस्तांच्या पोळी खाण्यावर त्यामुळे बंधने. ‘एचडी ३२२६’ हा गहू मात्र मधुमेहग्रस्तांसाठी वरदान ठरण्याची शक्यता. जास्त प्रथिने असल्याने हा गहू ग्लिसमिक रिस्पॉन्स इंडेक्समध्ये तळाच्या क्रमवारीत असेल. या गव्हाची चपाती खाल्ल्यानंतर कार्बोहायड्रेटचे ग्लुकोजमध्ये रूपांतर होण्यास बराच अवधी लागेल, त्यावर संशोधन सुरू आहे.
‘पुसा’ कॅम्पसमध्ये गव्हाचे वाण विकसित करताना वातावरणात होणारे बदल, पिकावरील रोगांचा अभ्यास केला जातो. संकर करून नवे वाण विकसित केले जाते. ग्रेकल व एचडी २८९४ चे संकर करून सर्वोत्तम एचडी ३२२६ वाण विकसित करण्यात आले आहे.
पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड व जम्मू-काश्मीर गटात सर्वाधिक गहू पिकतो. या गटात नव्या वाणाची चाचणी. भारतात एकूण ३२ मिलियन हेक्टरमध्ये ९८ मिलियन टन उत्पादन. एकूण ७ ते ८ मिलियन हेक्टरमध्ये आयएआरआय विकसित एचडी २९६७ व एचडी ३०८६ हेच वाण वापरले जाते.
एचडी २९६७ या वाणावर पिवळा तांबेरा येत असल्यामुळे अधिक उत्पादन देणारे एचडी ३२२६ वाण शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल.
>एचडी ३२२६ ची वैशिष्ट्ये
अति उष्ण, अति शीत हवामान, अवकाळी पावसात हे वाण तग धरू शकेल. संपूर्ण पीक उद्ध्वस्त करणाºया यलो रस्ट (तांबेरा), कर्नाल बंट व पावडरी मिल्ड्यू - या रोगांशी लढण्याची क्षमता. सरासरी उत्पादकता प्रतिहेक्टर ५८ क्विंटल. हवामान, हाताळणी, औषध फवारणी - जुळून आल्यास प्रतिहेक्टर ७९.८ क्विंटल उत्पादन. या वाणात सर्वाधिक सरासरी १३ व जास्तीत जास्त १४ टक्के प्रथिने. उत्पादन जास्त झाले तरी प्रथिने कमी होणार नाहीत. ‘अ‍ॅग्री फूड कॅनडा’ संस्थेतील संशोधक डॉ. सिजो जोसेफ आणि डॉ. गायकवाड यांच्यात झालेल्या चर्चेनुसार हे वाण ‘लो ग्लिसमिक इंडेक्स’मध्ये समाविष्ट होऊ शकेल; पण त्यासाठी अजून संशोधनाची गरज.

 

Web Title: Various varieties of wheat varieties developed in the changing weather, diseases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.