वसईत सर्वपक्षीय उमेदवार एका मंचावर

By admin | Published: October 8, 2014 01:15 AM2014-10-08T01:15:41+5:302014-10-08T01:15:41+5:30

प्रा. स. गो. वर्टी स्मृती विचार व्याखानमालेच्या वतीने ‘विधानसभेसाठी मीच उमेदवार का? ’

Vasayet all-round candidate on one platform | वसईत सर्वपक्षीय उमेदवार एका मंचावर

वसईत सर्वपक्षीय उमेदवार एका मंचावर

Next

नायगांव : प्रा. स. गो. वर्टी स्मृती विचार व्याखानमालेच्या वतीने ‘विधानसभेसाठी मीच उमेदवार का? ’ याअंतर्गत वसई विधानसभा मतदारसंघातील चार उमेदवारांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ यांनी केले.
आपल्या अडचणी दूर होऊन उतम प्रशासक मिळावा, यासाठी मतदार लोकप्रतिनिधींना निवडून देतात. मात्र, असा उत्तम कारभार करण्यात यावा, यासाठी गरजा व मागण्यांचा समतोल राखता आला पहिजे. परंतु, आजचे राजकारण पाहिले तर राजकारणाचा समतोल ढासळलेला दिसतो. प्रश्न केवळ भ्रष्टाचाराचाच नाही तर उत्तम कारभाराचा आहे.
वसईचा विचार केला तर वसईसाठी वाहतुकीचा मोठा प्रश्न आहे. तो तातडीने सोडवायला हवा. प्रकल्पांची गरज ओळखून त्यानुसार सुविध पुरवणे आवश्यक आहे. आता नव्या आर्थिक वर्षात बेरोजगारांच्या कौशल्याला वाव देत त्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात रोजगार उपलब्ध करून देणे, तसेच आवश्यक वैद्यकीय सुविधा माफक दरात देणे गरजेचे आहे.
काँग्रेसचे मायकल फुर्ट्याडो यांनी वसईची लोकसंख्या वाढत असल्याने सुविधांचा तुटवडा जाणवत असल्याचे म्हटले. सध्या न्यायालयात सुरू असलेली गावांची लढाई यशस्वी होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तर बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी वसई-विरार हा जलदगतीने लोकसंख्या वाढणारा प्रदेश असल्याने वर्टी समितीने केलेल्या सर्व्हेक्षणानुसार महानगरपालिका स्थापन करण्यात आली. आज केवळ वसई प्रभागासाठी १०० कोटींच्या विकासकामांची तरतुद झाली. पाणी योजनांमधून ५०० एमएलडी जास्त पुरवठा होणार आहे. या वाढत्या मागण्यांना मिळणारा निधीच आवश्यक तरतुद करेल असे ठाकूर म्हणाले. तर मनवेल तुस्कानो यांनी धर्मनिरपेक्षतेची गरज असल्याचे सांगितले. न्यु इंग्लिश स्कुल वसई माजी विद्यार्थी महासंघाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. (वार्ताहर)

Web Title: Vasayet all-round candidate on one platform

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.