निकालापूर्वीच राजस्थानमध्ये हालचालींना वेग! बंडखोर, अपक्ष उमेदवारांशी संपर्क, वसुंधरा राजे ॲक्शनमोडमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2023 01:22 PM2023-12-02T13:22:03+5:302023-12-02T13:24:52+5:30

देशातील पाच राज्यातील विधानसभेचा निकाल उद्या रविवारी समोर येणार आहेत. ससर्वच पक्षांनी या निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली होती.

vasundhara raje dials sanchore jeevaram chaudhary bjp and congress contacted rebels | निकालापूर्वीच राजस्थानमध्ये हालचालींना वेग! बंडखोर, अपक्ष उमेदवारांशी संपर्क, वसुंधरा राजे ॲक्शनमोडमध्ये

निकालापूर्वीच राजस्थानमध्ये हालचालींना वेग! बंडखोर, अपक्ष उमेदवारांशी संपर्क, वसुंधरा राजे ॲक्शनमोडमध्ये

देशातील पाच राज्यातील विधानसभेचा निकाल उद्या रविवारी समोर येणार आहेत. ससर्वच पक्षांनी या निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली होती. दोन दिवसापूर्वी या राज्यांचा एक्झिट पोल समोर आले असून यात भाजप आणि काँग्रेसमध्ये काटावर चक्कर असल्याचे दाखवले होते, यामुळे आता सर्वच पक्षांनी अपक्ष आणि बंडखोर आमदारांसोबत संपर्क वाढवला आहे. राजस्थानमध्येही भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार लढत असून आता वसुंधरा राजे ॲक्शनमोडमध्ये आल्या असल्याचे बोलले जात आहे. 

गहलोत यांच्यानंतर वसुंधरा राजेंनीही घेतली राज्यपालांची भेट; निकालांआधी हालचाली वाढल्या

एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला भाजपपेक्षा काटावर आघाडी असल्याचे दाखवले आहे.आता दोन्ही पक्षांचे नेते सक्रिय झाले आहेत. वसुंधरा राजे यांनी स्वत: भाजपची आघाडी हाती घेतली आहे, तर अशोक गेहलोत काँग्रेसकडून रिंगणात आहेत. दोन्ही नेते अपक्ष उमेदवार आणि बंडखोरांशी संपर्क साधत आहेत. त्रिशंकू झाल्यास बहुमताचे आकडे करण्यासाठी या आमदारांचा वापर होऊ शकतो.  वसुंधरा राजे सिंधिया यांनी शुक्रवारी सांचोरचे माजी आमदार आणि यावेळी अपक्ष म्हणून निवडणूक लढविणारे जीवराम चौधरी यांना फोन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. जीवराम चौधरी यांनी वसुंधरा यांना विजयाचे प्रमाणपत्र घेऊन जयपूरला येत असल्याचे सांगितले. जालोरच्या सांचोर विधानसभा मतदारसंघातून भाजपविरोधात बंडखोरी केलेले जीवराम चौधरी यांनी सलग दुसऱ्यांदा अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आहे. 

सांचोरमध्ये जीवराम यांची थेट स्पर्धा काँग्रेसच्या सुखराम विश्नोई यांच्याशी आहे. "दोन दिवसांपूर्वी अशोक गेहलोत यांचाही फोन आला होता",असे ते म्हणाले. जीवराम चौधरी यांना मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचाही फोन आल्याचा दावा त्यांचे समर्थक करत आहेत. गेहलोत यांनी जीवराम यांना जयपूर येथे भेटण्यास सांगितले होते. याबाबत जीवराम चौधरी यांना विचारले असता ३ डिसेंबरलाच आपली बाजू मांडणार असल्याचे सांगितले. सांचोरमध्ये कायदा आणि सुव्यवस्था आणि नर्मदेच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणारे जीवराम चौधरी मजबूत दिसत आहेत, त्यामुळे जयपूरमधून त्यांना मुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्र्यांचे फोन येत आहेत.

काँग्रेस, भाजप बंडखोरांशी संपर्कात

बारमेर जिल्ह्यात पक्षाच्या नेत्यांनी भाजप बंडखोर रवींद्र सिंह भाटी आणि प्रियंका चौधरी यांच्याशी संपर्क साधला आहे. या दोघांशीही काँग्रेसने संपर्क साधला आहे. काँग्रेसच्या आणखी दोन बंडखोरांवरही भाजपची नजर आहे. रवींद्र भाटी आणि प्रियंका चौधरी यांनी सांगितले की, त्यांना भाजप आणि काँग्रेस नेत्यांचे फोन येत आहेत. 

Web Title: vasundhara raje dials sanchore jeevaram chaudhary bjp and congress contacted rebels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.