लोकसभा लढण्यास वसुंधरा राजेंचा नकार; मनेका गांधींना हरियाणातील कर्नालला पसंती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 05:15 AM2019-02-13T05:15:23+5:302019-02-13T05:15:59+5:30

लोकसभेची आगामी निवडणूक लढण्यास परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी नकार दिल्यानंतर आता मनेका गांधी आणि वसुंधरा राजे यांनी भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांच्यासमोर प्रश्न उभा केला आहे.

Vasundhara Raje refuses to contest Lok Sabha polls; Maneka Gandhi likes Karnal in Haryana | लोकसभा लढण्यास वसुंधरा राजेंचा नकार; मनेका गांधींना हरियाणातील कर्नालला पसंती

लोकसभा लढण्यास वसुंधरा राजेंचा नकार; मनेका गांधींना हरियाणातील कर्नालला पसंती

- हरीश गुप्ता

नवी दिल्ली : लोकसभेची आगामी निवडणूक लढण्यास परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी नकार दिल्यानंतर आता मनेका गांधी आणि वसुंधरा राजे यांनी भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांच्यासमोर प्रश्न उभा केला आहे.
महिला आणि बालविकासमंत्री मनेका गांधी यांना त्यांच्या पिलिभीत या पारंपरिक मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवायची इच्छा नाही. त्यांना हरियाणातील कर्नाल मतदारसंघ हवा आहे. भाजपातील उच्च पातळीवरील सूत्रांनी ‘लोकमत’ला मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार मेनका गांधी यांनी अमित शहा यांची गेल्या आठवड्यात भेट घेतली. पिलिभीतमधील आजची राजकीय परिस्थिती हितकारक नाही, असे त्या शहा यांना म्हणाल्या.
कर्नालमधील विद्यमान खासदार अश्विनी कुमार मीना यांनी कर्नालमधून लढण्यास असमर्थता व्यक्त केल्यामुळे त्यांच्या जागी माझा विचार व्हावा, अशी विनंती गांधी यांनी शहा यांना केली. तुमच्या विनंतीचा विचार केला जाईल, असे शहा यांनी सांगून राज्याच्या नेत्यांशी चर्चा करा, असा सल्ला त्यांना दिल्याचे समजते.
राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी लोकसभा निवडणूक लढविण्यास स्पष्ट नकार दिला आहे. राजे यांनी लोकसभा निवडणूक लढवावी म्हणजे त्यातून योग्य तो संदेश जाईल व सर्व २५ जागा जिंकण्याची कामगिरी पुन्हा करता येईल, अशी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची इच्छा आहे; परंतु राजे यांनी स्पष्टपणे नकार देत मी माझा मुलगा दुष्यंत सिंह याच्या जागी जाणार नाही, असे ठामपणे सांगितले.
दुष्यंत सिंह यांनी लोकसभा निवडणूक दोन वेळा जिंकली आहे. वसुंधरा राजे यांनी त्या राज्याच्या राजकारणातून दिल्लीत तळ हलविणार नाहीत, असे म्हटले.

सपा, बसपा युतीने झोप उडविली
मनेका गांधी यांनी २०१४ मध्ये लोकसभा निवडणूक पिलिभीत मतदारसंघातून ५२ टक्के मते मिळवून फार मोठ्या फरकाने जिंकली होती. आता मात्र समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाच्या युतीमुळे व त्यांना काँग्रेसचा पाठिंबा असल्यामुळे मनेका गांधींची झोप उडाली आहे.
गांधी यांना ५.४६ लाख मते मिळाली होती, तर त्यांचे तीन विरोधक एकत्र आले, तर त्यांची मते ४.६६ लाख
होतात.
आजच्या परिस्थितीत पिलिभीत सुरक्षित जागा राहिली नाही म्हणून त्यांना मतदारसंघ बदलून हवा आहे.

Web Title: Vasundhara Raje refuses to contest Lok Sabha polls; Maneka Gandhi likes Karnal in Haryana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.