जेईई-ॲडव्हान्समध्ये वेद लाहोटी देशात अव्वल, ४८ हजार विद्यार्थी आयआयटीसाठी पात्र; मुलींमध्ये द्विजा पटेल पहिली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2024 07:30 AM2024-06-10T07:30:15+5:302024-06-10T07:30:46+5:30
EE-Advanced Exam Result: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतील (आयआयटी) प्रवेशासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या जेईई-ॲडव्हान्स या सामाईक प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये दिल्ली झोनच्या वेद लाहोटी याने अव्वल कामगिरी करत देशातील सर्वोत्तम तंत्रशिक्षण शिक्षणसंस्थेत आपला प्रवेश निश्चित केला.
मुंबई - इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतील (आयआयटी) प्रवेशासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या जेईई-ॲडव्हान्स या सामाईक प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये दिल्ली झोनच्या वेद लाहोटी याने अव्वल कामगिरी करत देशातील सर्वोत्तम तंत्रशिक्षण शिक्षणसंस्थेत आपला प्रवेश निश्चित केला. त्याने ३६० पैकी ३५५ गुण मिळविले. मुलींमध्ये ३३२ गुण मिळवित द्विजा पटेल या विद्यार्थिनीने अव्वल कामगिरी केली.
मुंबई झोनमधून राजदीप मिश्रा (सहावा), ध्रुवीन दोशी (नववा), शॉन कोशी (१५वा) आणि आर्यन प्रकाश (१७वा) यांनी अव्वल कामगिरी केली. दिल्ली झोनचा आदित्य (३४६ गुण) दुसऱ्या रँकवर आहे. तिसऱ्या क्रमांकावर भोगलपल्ली संदेश (३३८ गुण) हा मद्रास झोनचा विद्यार्थी आहे. चौथ्यावर रूरकीचा रिदम केडिया (३३७ गुण) आहे. तर, पाचवा क्रमांक मद्रासच्या पुट्टी कुशल कुमार (३३४ गुण) याने पटकावला. या परीक्षेला देशभरातून १.८० लाख विद्यार्थी बसले होते.
प्रवर्ग विषयनिहाय एकूण
खुला ८.६८% ३०.३४%
ओबीसी ७.८% २७.३०%
इडब्ल्यूएस ७.८% २७.३०%
एससी ४.३४% १५.१७%
एसटी ४.३४% १५.१७%
अपंग ४.३% १५.१७%
जेईई-ॲडव्हान्सकरिता
पात्र ठरलेले विद्यार्थी २.५ लाख
परीक्षेकरिता नोंदणी
केलेले विद्यार्थी १,८६,५८४
प्रत्यक्ष परीक्षा
दिलेले विद्यार्थी १,८०,२००
प्रवेश पात्र ठरलेले
विद्यार्थी ४८,२४८
नाेंदणी केलेली मुले १,४३,६३७
प्रवेश पात्र मुले ४०,२८४
परीक्षा देणारी मुले १,३९,१७०
नाेंदणी केलेल्या मुली ४२,९४७
परीक्षा देणाऱ्या मुली ४१,०२०
प्रवेश पात्र मुली ७,९६४