दिल्लीचे माजी पोलीस आयुक्त, तीन राज्यांचे माजी राज्यपाल वेद मारवाह यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2020 02:05 AM2020-06-06T02:05:23+5:302020-06-06T02:06:13+5:30
मारवाह यांच्या निधनाची माहिती गोवा पोलिसांनी टि्वटरवर दिली आहे.
म्हापसा: दिल्लीचे माजी पोलीस आयुक्त आणि त्यानंतर मणिपूर, मिझोराम आणि झारखंडचे राज्यपाल राहिलेले वेद मारवाह यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.
मारवाह यांच्या निधनाची माहिती गोवा पोलिसांनी टि्वटरवर दिली आहे. गोव्यातील म्हापशाच्या एका हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पोलीस दलाच्या एका महान नेतृत्वाच्या निधनाने दु:ख झाले आहे. त्यांनी पोलिस दलाचे आव्हानात्मक काळात नेतृत्व केले. तसेच तीन राज्यांना राज्यपालाच्या रुपामध्ये मार्गदर्शन केले, असे या ट्विटमध्ये म्हटले आहे.
Ved Marwah, former Police Commissioner of Delhi and former Governor of Manipur, Jharkhand and Mizoram passes away at a hospital in Goa's Mapusa. He was 87. pic.twitter.com/eO26wrB7WM
— ANI (@ANI) June 5, 2020