तुतिकोरीन प्रकल्पात प्रवेश मिळण्यासाठी वेदांता कोर्टात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 03:42 AM2018-06-21T03:42:39+5:302018-06-21T03:42:39+5:30
तामिळनाडूतील तुतिकोरीन येथील स्टरलाईट प्रकल्पात अॅसिड टाकीतून गळती सुरू झाल्याचे आढळून आल्यानंतर वेदांता समूहाने प्रकल्पात प्रवेश मिळविण्यासाठी चेन्नई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
नवी दिल्ली : तामिळनाडूतील तुतिकोरीन येथील स्टरलाईट प्रकल्पात अॅसिड टाकीतून गळती सुरू झाल्याचे आढळून आल्यानंतर वेदांता समूहाने प्रकल्पात प्रवेश मिळविण्यासाठी चेन्नई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. कंपनीने याचिकेत म्हटले आहे की, अॅसिड गळतीमागे घातपाताची शक्यता असून, देखभाल व दुरुस्तीसाठी किमान मनुष्यबळासह प्रकल्पात प्रवेश करू द्यावा, व येथील वीजपुरवठा सुरू करण्यात यावा.