काश्मीरमध्ये अकोल्यातील जवानाला वीरमरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 06:27 AM2017-08-14T06:27:59+5:302017-08-14T06:28:02+5:30
शनिवारी रात्रीपासून सुरू झालेल्या चकमकीत हिज्बुल मुजाहिद्दिनचा स्वयंभू कमांडर यासिन इटू उर्फ गजनवी याच्यासह तीन अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला.
जम्मू : दक्षिण काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यात शनिवारी रात्रीपासून सुरू झालेल्या चकमकीत हिज्बुल मुजाहिद्दिनचा स्वयंभू कमांडर यासिन इटू उर्फ गजनवी याच्यासह तीन अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला. या चकमकीत सैन्याचे दोन जवान शहीद झाले. शहीद झालेल्या जवानात महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील लोणाग्रा गावचा जवान सुमेध वामन गवई, तामिळनाडूतील जवान इलयाराजा पी यांचा समावेश आहे.
शोपिया जिल्ह्यात अवनीरा गावात अतिरेकी असल्याची माहिती मिळाल्यानंतर, जम्मू - काश्मीर पोलीस, सैन्यदल
आणि सीआरपीएफने विशेष मोहीम
हाती घेऊन तपास सुरू केला. याच वेळी चकमक उडाली. यात सैैन्याचे पाच जवान जखमी झाले. जखमी झालेल्या पाच जवानांना सैन्याच्या ९२ बेस येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. यातील दोन जवानांचा नंतर मृत्यू झाला.