सीमारेषेवर 2 जवान शहीद, महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण

By admin | Published: October 29, 2016 08:20 AM2016-10-29T08:20:44+5:302016-10-29T11:28:43+5:30

कुपवाडाच्या माछिल सेक्टरमध्ये गस्त घालणा-या लष्करी तुकडीवर दहशतवादी हल्ला करण्यात आला, ज्यामध्ये बीएसएफचे दोन जवान शहीद झाले आहेत.

Veeramaran, the son of Maharaja of Maharashtra, has two soldiers in the border | सीमारेषेवर 2 जवान शहीद, महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण

सीमारेषेवर 2 जवान शहीद, महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण

Next
ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 29 - पाकिस्तानने अजूनही आपल्या कुरापती सुरू ठेवल्या असून सीमारेषेवरील भागांमध्ये गोळीबार करत आहे. कुपवाडाच्या माछिल सेक्टरमध्ये गस्त घालणा-या लष्करी तुकडीवर दहशतवादी हल्ला करण्यात आला, ज्यामध्ये बीएसएफचे दोन जवान शहीद झाले आहेत. शीख रेजिमेंट्सचे मनदीप सिंह आणि नितीन सुभाष कोळी अशी शहीद झालेल्या जवानांची नावे आहेत. शहीद जवान नितीन सुभाष कोळी हे महाराष्ट्राचे सुपूत्र असून सांगलीचे रहिवासी आहेत. एकीकडे संपूर्ण देश दिवाळी साजरी करत असताना दुसरीकडे सीमारेषेवरील जवान मात्र शत्रूशी दोन हात करत जीवाची बाजी देऊन लढत आहेत. भारताच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानने तब्बल 53 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे.
 
जम्मू काश्मीरमधील कठुआ सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून तोफमारा करत शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं. सकाळी 7 वाजून 20 मिनिटांनी पाकिस्तानने हल्ला करण्यास सुरुवात केली. बीएसएफने चोख प्रत्युत्तर दिलं आहे. सीमारेषेवरील तणाव लक्षात घेता सीआरपीएफने काश्मीरमध्ये सुरक्षा वाढवली असून चेक पॉईंट्सही वाढवली आहेत.
 
 (१५ पाक रेंजर्सचा खात्मा)
(दहशतवादी हल्ल्यात भारतीय जवान शहीद)
 
दरम्यान पाकिस्तानी फौजांकडून आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेलगत होत असलेल्या हल्ल्याला तडाखेबाज उत्तर देत भारतीय सीमा सुरक्षा दलाने १५ पाकिस्तानी रेंसर्जचा खात्मा केला आहे. पाकच्या काही चौक्याही उद्ध्वस्त करण्यात आल्या. सीमेपलीकडून हल्ल्यासाठी वापरण्यात आलेली स्फोटके पाहता पाकिस्तानी लष्कर या रेंजर्सना मदत करीत आहे, असा दावा बीएसएफने केला होता.
 
सीमेपलीकडून पाकिस्तानच्या निमलष्करी सैनिकांनी जम्मूतील नियंत्रण रेषेलगतच्या भागात केलेल्या उखळी तोफांच्या माऱ्यासोबत केलेल्या गोळीबारात दोन भारतीय नागरिक ठार, तर अन्य दोन जखमी झाले. गुरुवारी रात्रीपासून पाकिस्तानी सैनिकांनी उखळी तोफांसोबत गोळीबार करीत आंतरराष्ट्रीय सीमा, तसेच जम्मू, कथुआ, पूंछ व राजौरी जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवरील भारतीय चौक्यांसोबत नागरी वस्त्यांना लक्ष्य केले. 
 
दहशतवाद्यांची रानटी वृत्ती; शहीद जवानाचे अवयव कापले
कुपवाडा जिल्ह्यात मकहिल भागात नियंत्रण रेषेजवळ घुसखोरी रोखताना शहीद झालेल्या भारतीय जवानाचे अवयव कापून रानटी वृत्तीचे दहशतवादी पळून गेले. या घटनेला प्रत्युत्तर दिले जाईल, असेही सैन्य विभागाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. पळून जाणाऱ्या दशतवाद्यांपैकी एक जण ठार झाला.
 

Web Title: Veeramaran, the son of Maharaja of Maharashtra, has two soldiers in the border

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.