'वीरपत्नीचा सेल्फी', शहीद पतीला लग्नाच्या वाढदिवशी 'भावूक शुभेच्छा'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2019 05:34 PM2019-02-01T17:34:39+5:302019-02-01T17:36:06+5:30
कर्नल एम.एन. राय हे 42 राष्ट्रीय रायफल - 9 गोरखा या बटालियनेच कर्नल होते. काश्मीर खोऱ्यातील पुलवामा येथे हिज्बुल मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांशी लढताना त्यांना वीरगती प्राप्त झाली.
नवी दिल्ली - जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना शहीद कर्नल मुनेंद्र नाथ राय यांना वीरमरण आले होते. विशेष म्हणजे 26 जानेवारी रोजी कर्नल मुनेंद्र नाथ यांना वीरता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यानंतर, दुसऱ्याच दिवशी, म्हणजेच 27 जानेवारी 2015 रोजी पुलवामा येथे दहशतवाद्यांशी लढताना ते शहीद झाले. आपल्या शहीद पतीसोबत लग्नाचा वाढदिवस साजरा करताना, वीरपत्नी प्रियांका यांनी सेल्फी चक्क स्मारकासोबत सेल्फी घेतला. प्रियांका यांचा हा भावूक फोटो नेटकऱ्यांनीही वीरपत्नीला सॅल्यूट केला आहे.
कर्नल एम.एन. राय हे 42 राष्ट्रीय रायफल - 9 गोरखा या बटालियनेच कर्नल होते. काश्मीर खोऱ्यातील पुलवामा येथे हिज्बुल मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांशी लढताना त्यांना वीरगती प्राप्त झाली. देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरपुत्र राय यांच्या मागे त्यांची पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या पत्नी प्रियांका या लग्नाच्या वाढदिवसाला अतिशय भावूक झाल्या. आपल्या पतीच्या आठवणीने त्या गहिवरल्या होत्या. त्यामुळेच पतीच्या स्मारकासोबत सेल्फी काढून प्रियांका यांनी लग्नाचा 18 वा वाढदिवस साजरा केला आहे. सध्या, सोशल मीडियावर प्रियांका यांचा हा फोटो व्हायरल होत असून जय हिंद आणि सॅल्यूट अशा कमेंट त्यांच्या फोटोला मिळत आहेत. इंडियन मिलिटरी मेमस या फेसबुक पेजवरही हा फोटो अपलोड करण्यात आला आहे. दरम्यान, वडिलांच्या मृत्यूनंतर कर्नल मुनेंद्र नाथ यांची मुलगी अलकाने वडिलांना श्रद्धांजली वाहताना सॅल्यूट केला होता. त्यावेळी, अलकाचाही फोटो देशभर व्हायरल झाला होता. अलकाच्या धैर्याचे सर्वांनीच कौतुक केलं होत.