६ हजार पाहुणे, रुचकर भोजन अन् बरंच काही... 'असा' असेल नरेंद्र मोदींचा 'शपथविधी-2.0'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 02:33 PM2019-05-29T14:33:04+5:302019-05-29T14:47:59+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. या कार्यक्रमासाठी सहा हजारहून अधिक पाहुणे उपस्थित राहण्याचा अंदाज आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री देखील शपथ घेणार आहेत.

veg nonveg thali dal raisina rajbhog water bottles for 6000 guests | ६ हजार पाहुणे, रुचकर भोजन अन् बरंच काही... 'असा' असेल नरेंद्र मोदींचा 'शपथविधी-2.0'

६ हजार पाहुणे, रुचकर भोजन अन् बरंच काही... 'असा' असेल नरेंद्र मोदींचा 'शपथविधी-2.0'

Next

नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाने देशात अभूतपूर्व यश मिळवताना सलग दुसऱ्यांदा सत्ता आपल्याकडे राखली आहे. त्यामुळे पंतप्रधानपदाचा 'शपथविधी २.०' देखील विजयाप्रमाणेच मोठा होणार असा अंदाज लावण्यात आला होता. त्यानुसार राष्ट्रपती भवन प्रथमच एकावेळी सहा हजारहून अधिक पाहुण्यांचा पाहुणचार करणार असल्याचे समजते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. या कार्यक्रमासाठी सहा हजारहून अधिक पाहुणे उपस्थित राहण्याचा अंदाज आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री देखील शपथ घेणार आहेत. भारतीय जनता पक्षाच्या मोठ्या विजयानंतर भव्य दिव्य शपथविधी सोहळ्याची कल्पना अनेकांनी केली होती. मात्र राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शपथविधी सोहळा साध्या पद्धतीने करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. या सोहळ्यासाठीच्या नियोजनातील अधिकाऱ्याने सांगितले की, या क्षणाचे महत्त्व जाणून हा कार्यक्रम अत्यंत साध्य पद्धतीने आणि लक्षात राहण्यासारखा ककरण्याचे नियोजन आहे.

शपथविधी सोहळा राष्ट्रपती भवनच्या बाहेरच्या प्रांगणात होणार आहे. मुख्य रस्ता आणि मुख्य भवन यांच्या मध्यभागी भव्य रस्ता तयार करण्यात येणार आहे. या रस्त्याचा वापर विविध देशातील नेते आणि राज्यातील प्रमुखांसाठी करण्यात येणार आहे. राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलऐवजी राष्ट्रपती भवनच्या प्रांगणात पंतप्रधानांचा शपथविधी सोहळा आयोजित करण्याची ही चौथी वेळ आहे. राष्ट्रपती भवनच्या प्रांगणात सर्वप्रथम चंद्रशेखर यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. तर १९९८ मध्ये अटल बिहारी वाजपेयी आणि २०१४ मध्ये मोदींचा शपथविधी सोहळा पार पडला होता.

यावेळी शपथविधी सोहळ्याला १४ देशांचे प्रमुख बोलविण्यात आले आहे. यामध्ये अनेक देशांचे राजदूत, सामाजिती, राजकीय क्षेत्रातील जाणकार आणि चित्रपट सृष्टीतील नामवंत कलाकारांना आमंत्रित करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी प्रादेशिक आणि राष्ट्रीय पक्षांच्या प्रमुखांव्यतिरिक्त अनेक वरिष्ठ नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे.

शपथविधी सोहळा २०१४ प्रमाणेच होणार आहे. सायंकाळी सात वाजता सोहळ्यानंतर पाहुण्यांसाठी जेवनाची व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी व्हेज आणि नॉन व्हेजसह शाही पदार्थांची चव पाहुण्यांना चाखता येणार आहे. सोहळ्यासाठी भारताच्या पूर्व भागातून अनेकजण उपस्थित राहणार आहे. या भागात संध्याकाळी हलके अन्न ग्रहन केले जाते. त्यामुळे खास हलके अन्न बनविण्याच्या सूचना राष्ट्रपती भवनच्या आचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. जेवनाच्या मेनूमध्ये दाल रायसीना याला देखील स्थान देण्यात आले आहे. याला तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

२०१४ मध्ये पंतप्रधान मोदींचा शपथविधी सांयकाळी ६ वाजता ठेवण्यात आला होता. तर पाहुणे ४.३० वाजेपासून येण्यास सुरुवात झाली होती. गेल्या वेळी शपथविधी सोहळ्यात पाण्याच्या बाटल्यांची व्यवस्था करण्यात आली नव्हती. यावेळी मात्र राष्ट्रपती भवनकडून पाण्याच्या बाटल्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

 

Web Title: veg nonveg thali dal raisina rajbhog water bottles for 6000 guests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.