भाजी विक्रेते, दुकानांवर काम करणाऱ्यांपासून कोरोनाचा सर्वाधिक धोका; केंद्रनं राज्यांना दिली अशी सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2020 03:27 PM2020-08-08T15:27:04+5:302020-08-08T15:34:32+5:30
जिल्ह्यांत रुग्णांचे क्लस्टर्स अथवा मोठा उद्रेक होऊ शकतो. अशा प्रकारचा उद्रेक थांबवणे आवश्यक आहे. विशेषतः नव्या लोकेशनच्या ठिकाणी. तसेच सर्वाधिक लक्ष जीव वाचवण्यावर असायला हवे, असे भूषण यांनी म्हटले आहे.
नवी दिल्ली - किराणा दुकानांवर काम करणारे आणि रस्त्यांवरील विक्रेत्यांपासून कोरोना पसरण्याचा धोका सर्वाधिक असल्याचे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. अशा लोकांमुळे मोठ्या प्रमाणावर लोक संक्रमित होऊ शकतात, असे केंद्रीय आरोग्य विभागाने म्हटले आहे. तसेच राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना, अशा लोकांची वेगाने तपासणी करण्यात यावी, असा सल्लाही देण्यात आला आहे. आरोग्य मंत्राल्याने म्हटल्या प्रमाणे, यामुळे मृत्यू दर कमी होण्यासही मदत मिळू शकते. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी लिहिलेल्या पत्रात आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी हा सल्ला दिला आहे.
राज्यांनी वेगाने करावी तपासणी -
आरोग्य मंत्रालयाने या पत्रात म्हटले आहे, की "बंद असलेल्या कामाच्या ठिकाणी इंडस्ट्रिअल क्लस्टर्स असू शकतात, जेथे अधिकांश कोरोनाबाधित असलेल्या ठिकानांवरून लोक येत आहेत. झोपडपट्ट्या, जेल, वृद्धाश्रमांतदेखील हॉटस्पॉट असू शकतात. या शिवाय किराणा दुकानवाले, भाजी विक्रेते आणि इतरही काही विक्रेते संक्रमणास कारणीभूत ठरू शकतात, असे भाग आणि अशा कोलांची तपासणी ICMR च्या गाइडलाइन्स प्रमाणे तसेच वेगाने होणे आवश्यक आहे."
'नव्या ठिकाणी संक्रमणाला आळा घालणे आवश्यक'
भूषण यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे, ऑक्सिजनची व्यवस्था आणि क्विक रिस्पान्स मॅकेनिझमच्या रुग्णवाहिका ट्रान्सपोर्ट सिस्टमचीही आवश्यकता आहे. अनेक राज्यांत रुग्णांना रुग्णवाहिका मिळण्यात अडचणी येत आहे. आता नव्या भागांत रुग्ण समोर येत आहेत. यावर भूषण म्हणाले, जिल्ह्यांत रुग्णांचे क्लस्टर्स अथवा मोठा उद्रेक होऊ शकतो. अशा प्रकारचा उद्रेक थांबवणे आवश्यक आहे, विशेषतः नव्या लोकेशनच्या ठिकाणी. तसेच सर्वाधिक लक्ष जीव वाचवण्यावर असायला हवे, असेही भूषण म्हणाले.
'डेथ-रेट कमी करणे मुख्य लक्ष्य' -
भूषण यांनी हे पत्र, राज्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव, मुख्य सचिव आणि आरोग्य सचिवांना लिहिले आहे. या पत्रात, "आतापर्यंत आपण इतर देशांच्या तुलनेत चांगले काम केले आहे. आपला उद्देश मृत्यू-दर कमी करणे असायला हवा. आपण हे निश्चित करायला हवे, की हा दर 1 टक्क्याहून अधिक नसावा," असे म्हणण्यात आले आहे. तसेच, तपासणीचा वेग वाढवून रुग्णाना आयसोलेट अथवा अॅडमिट करणे आणि त्यांना चांगल्याप्रकारची वैद्यकीय सुविधा पुरवणे अथवा व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.
महत्त्वाच्या बातम्या -
CoronaVirus vaccine : 50 टक्के प्रभावी ठरली तरी लोकांना दिली जाणार कोरोना लस
CoronaVirus vaccine : रशियाने इंग्लंड-अमेरिकेला टाकले मागे! भारतालाही पुरवणार कोरोना लस
खूशखबर : 10 ऑगस्टपर्यंत येऊ शकते 'रशियन' कोरोना लस?; आरोग्य मंत्री म्हणाले, परीक्षण पूर्ण
Naagin Revenge : नाग पंचमीच्या दिवशी मारला 'नाग', नागिनीचा आतापर्यंत 26 जणांना चावा!
झटक्यात चमकलं मजुराचं नशीब; पाण्याने धुतली माती, मिळाले लाखोंचे हिरे
तंबाखूपासून तयार केली कोरोना लस? मानवी चाचणीसाठी मागितली परवानगी...