भाजीपाला कडाडला मिरची १०० रुपये किलो : टोमॅटो, भेंडीचा तुटवडा, वांगी मुबलक

By admin | Published: June 11, 2016 06:29 PM2016-06-11T18:29:08+5:302016-06-11T18:29:08+5:30

जळगाव : दुष्काळाची दाहकता जसजसी वाढली तसा भाजीपाल्याच्या उत्पादनालाही फटका बसला. आता तर मिरची, टोमॅटो, भेंडी, कारले यांचा मोठा तुटवडा आहे. त्यामुळे मागणी व पुरवठा याचे गणित बिघडले असून, किरकोळ बाजारामध्ये भाजीपाला कडाडला आहे.

Vegetables 100 grams of chilli: Tomato, okra of okra, abundant abundance | भाजीपाला कडाडला मिरची १०० रुपये किलो : टोमॅटो, भेंडीचा तुटवडा, वांगी मुबलक

भाजीपाला कडाडला मिरची १०० रुपये किलो : टोमॅटो, भेंडीचा तुटवडा, वांगी मुबलक

Next
गाव : दुष्काळाची दाहकता जसजसी वाढली तसा भाजीपाल्याच्या उत्पादनालाही फटका बसला. आता तर मिरची, टोमॅटो, भेंडी, कारले यांचा मोठा तुटवडा आहे. त्यामुळे मागणी व पुरवठा याचे गणित बिघडले असून, किरकोळ बाजारामध्ये भाजीपाला कडाडला आहे.
जळगाव बाजार समितीमध्ये नजीकच्या औरंगाबादमधून कारले व मिरची येत आहे. घाऊक बाजारात मिरचीला सहा हजार रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला. भेंडीला ३८०० रुपयांपर्यंत बाजार समितीमध्ये क्विंटलमागे भाव होता. शनिवारी भेंडी व मिरचीची फक्त प्रत्येकी १६ व १३ क्विंटल आवक झाली. मागील आठवड्यामध्ये ही आवक बर्‍यापैकी होती. पण त्यात आठवडाभरात मोठी घट झाली. भेंडीची आवक एरंडोल, धरणगावमधून झाली.

तुटवडा असल्याने हिरव्या मिरचीचा भाव १०० रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. दोडके, भोपळा, वांगी, गोल भेंडी वगळता सर्वच भाजीपाल्याचा भाव ५० रुपये किलोपेक्षा अधिक आहे. परिणामी गृहीणींचे बजेट कोलमडले आहे. ३०० रुपयातही पुरेसा भाजीपाला मिळेनासा झाला आहे. १०० रुपयात पाव किंवा अर्धा किलो अशा फक्त तीनच भाज्या मिळतात.
सिंचनासाठी पाणी नसल्याने भाजीपाला जगविणे कठीण झाले आहे. भाजीपाल्यासही अधिक पाण्याची गरज असते. परंतु दुष्काळी स्थितीमुळे भाजीपाला पिकविणार्‍या धरणगाव, पाचोरा, एरंडोल, भडगाव, जळगाव, जामनेर, भुसावळ, यावल या तालुक्यांमध्ये स्थिती खराब झाली आहे. अनेकांना पुरेशा पाण्याअभावी भाजीपाल्याचे पीक उपटून फेकून द्यावे लागले.
शहरातील बळीराम पेठ, बीजे मार्केट भागातील भाजीबाजारामध्ये भाज्यांचे भाव तेजीत आहेत. पिंप्राळ्याच्या बाजारामध्ये शेतकरी स्वत: आपला भाजीपाला विक्रीसाठी येतात. त्यामुळे या बाजारामध्ये भाजीपाला काही प्रमाणात स्वस्त असतो. परंतु हा बाजार फक्त बुधवारी भरतो. त्यामुळे गोलाणी मार्केट, बळीराम पेठेतील व उपनगरांमधील लहान, मोठ्या बाजारातून भाजीपाला घेण्याशिवाय ग्राहकांसमोर पर्याय नाही. घाऊक बाजार आणि किरकोळ बाजारातील भाजीपाल्याच्या भावामध्ये मोठी तफावत आहे. त्यामुळे ग्राहकांना चढ्या भावात भाजीपाला घ्यावा लागत असल्याचे चित्र आहे.

विविध भाजीपाल्याचे भाव
(भाव प्रतिकिलोचे)
मिरची- ९० ते १००
कारले- ६० ते ७०
गिलके- ६०
वांगी- ४० ते ४५
ढोबळी मिरची- ८० ते ९०
कोथिंबीर- १५ रुपये जुडी
गोल भेंडी- ४० ते ४५
लांब भेंडी- ६०
गवार- ६० ते ७०
मेथी- ६०
वाटाणे- ६० ते ७०
दोडके- ४०
भोपळा- ४०
टोमॅटो- ६०

Web Title: Vegetables 100 grams of chilli: Tomato, okra of okra, abundant abundance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.