मधुमेह असतानाही 71 वर्षांच्या व्यंकय्या नायडूंनी कशी जिंकली कोरोनाची लढाई? सांगितलं सिक्रेट!
By श्रीकृष्ण अंकुश | Published: October 14, 2020 11:53 AM2020-10-14T11:53:58+5:302020-10-14T11:56:21+5:30
व्यंकय्या नायडू यांना 29 सप्टेंबरला कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आले होते. यानंतर सोमवारी 12 ऑक्टोबरला RT-PCR टेस्टनंतर त्यांनी स्वतःच आपला कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती दिली आहे. म्हणजे ते केवळ दोन आठवड्यांच्या आतच रिकव्हर झाले. (Vice President Venkaiah Naidu)
नवी दिल्ली - देशी खाद्य पदार्थ आणि फिजिकल फिटनेस मुळे उप राष्ट्रपती व्यंकय्या नायडू (Venkaiah Naidu) कोरोनातून लवकर बरे होऊ शकले. स्वतःला फिट आणि पॉझिटिव्ह ठेवण्यासाठी ते काय करत होते, हे त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे. एवढेच नाही, तर फिजिकल फिटनेस, मेंटल एक्सरसाईज आणि खाण्यात देशी गोष्टींचा वापर केल्यास आपण या इंफेक्शनविरोधातील लढाई जिंकू, असा अपल्याला विश्वास होता, असे नायडू यांनी म्हटले आहे.
आपल्या पोस्टमध्ये व्यंकय्या नायडू यांनी म्हटले आहे, 'मला विश्वास आहे, की माझे वय आणि मधुमेहासारख्या (Diabetes) काही व्यैद्यकीय समस्या असतानाही, मी फिजिकल फिटनेस, मानसिक तप, योग आणि वॉकिंग सारख्या रेग्युलर एक्सरसाईजमुळे कोविड-19ची लढाई जिंकू शकलो. या शिवाय मी केवळ देशी खाद्य पदार्थच घेत होतो. आपल्या सेल्फ आयसोलेशन काळात मी याच गोष्टी केल्या.'
कोरोनावर मात केल्यानंतर नायडू यांनी आपले अनुभव सांगत लोकांना वॉकिंग, जॉगिंग अथवा योग यांसारखा नियमित व्यायाम करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले आहे, 'डायटमध्ये प्रथीनयुक्त पदार्थ खाणे आणि जंक फूड पूर्णपणे टाळणे हेही महत्वाचे आहे. याशिवाय, आपल्या सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेणे, मास्क लावणे, नेहमी-नेहमी हात धुणे, नेहमी स्वच्छतेची काळजी घेणे आदी प्रोटोकॉल्स कठोरपणे पाळणे अत्यंत आवश्यक आहे.'
होम क्वारनटीन काळातील आपल्या दिनचर्येसंदर्भात बोलताना ते म्हणाले, न्यूज पेपर, मॅगझीन आणि आर्टिकल वाचत असल्याने त्यांचा दिवस अत्यंत चांगला गेला. ते म्हणाले, 'या काळात मी स्वतंत्रता आंदोलनाच्या संदर्भातीलही अनेक गोष्टींचे अध्ययन केले. मी दर आठवड्याला दोन फेसबुक पोस्टदेखील लिहीत आहे. यात स्वातंत्र्य संग्रामातील काही अनोळखी शूरवीरांच्या बलिदानांचे आणि शौर्याचे किस्से आहेत.'
व्यंकय्या नायडू यांना 29 सप्टेंबरला कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आले होते. यानंतर सोमवारी 12 ऑक्टोबरला RT-PCR टेस्टनंतर त्यांनी स्वतःच आपला कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती दिली आहे. म्हणजे ते केवळ दोन आठवड्यांच्या आतच रिकव्हर झाले आहेत. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी कोरोनातून रिकव्हरीसाठी प्रार्थना करणाऱ्यांचे, शुभचिंतकांचे, वैद्यकीय कर्मचारी आणि डॉक्टर्स यांचे आभारही मानले आहेत.