व्यंकय्या नायडूंना राष्ट्रपतीपदाचा उमेदवार करणार भाजप? शाह यांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 02:28 PM2022-06-21T14:28:47+5:302022-06-21T14:31:29+5:30

राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराच्या नावावर आज होणार मंथन...

Venkaiah Naidu may next Presidential candidate Amit Shah Rajnath Singh jp nadda meeting | व्यंकय्या नायडूंना राष्ट्रपतीपदाचा उमेदवार करणार भाजप? शाह यांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण

व्यंकय्या नायडूंना राष्ट्रपतीपदाचा उमेदवार करणार भाजप? शाह यांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण

Next


केंद्रीय मंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी मंगळवारी उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांची भेट घेतली. भाजपची राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसंदर्भात आज होणाऱ्या महत्वाच्या बौठकीपूर्वीच, ही  भेट झाली आहे.

यामुळे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू हे सत्ताधारी भाजपचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार होणर का? यासंदर्भात कयास लावले जात आहेत. भाजपने राजनाथ सिंह आणि जेपी नड्डा यांच्याकडे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसंदर्भात विरोधी पक्षांसह इतरही पक्षांसोबत चर्चा करण्याची जबाबदारी दिली आहे. 

राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराच्या नावावर आज होणार मंथन - 
आजच भाजपच्या संसदीय बोर्डाची बैठक होत आहे. या बैठकीत एनडीएच्य राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराच्या नावावर मंथन होणार आहे. यामुळेच शाह, सिंह आणि नड्डा यांची नायडू यांच्यासोबतची बैठक महत्वाची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीही या बैठकीत सामील होऊ शकतात.
 
नड्डा आणि सिंह या दोघांनीही राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराच्या नावावर समहती मिळविण्यासाठी, आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार, तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी, जनता दल (यूनायटेड) प्रमुख नीतीश कुमार, बीजू जनता दल प्रमुख नवीन पटनायक आणि नॅशनल काँफ्रन्स प्रमुख फारूक अब्दुल्ला यांच्यासह वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा केली आहे.

संख्याबळाचा विचार करता, राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी भाजप प्रणित एनडीए मजबूत स्थितीत आहे आणि जर त्यांना बीजू जनता दल अथवा आंध्र प्रदेशचा सत्ताधारी पक्ष वाईएसआर काँग्रेस सारख्या पक्षाचे समर्थन मिळाले तर त्यांचा विजय निश्चित आहे.

Web Title: Venkaiah Naidu may next Presidential candidate Amit Shah Rajnath Singh jp nadda meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.